विदर्भासाठी मोठी बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरावती मेगा टेक्स्टाईल पार्कला मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलतांना ही माहिती दिली आहे. या मंजुरीबद्दल फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. या पार्कमुळे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठं फायदा होईल तसेच तीन लक्ख रोजगार निर्मिती होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
फडणवीस म्हणाले , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार मानतो की त्यांनी महाराष्ट्रमध्ये अमरावतीमध्ये मेगा टेक्सटाईल पार्कला मान्यता दिली आहे मागच्या काळामध्ये हा प्रस्ताव मी पाठवला होता आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा मी करत होतो. मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि मी स्वतः यासंदर्भात पत्र लिहून पंतप्रधानांना विनंती केली होती. आज हा टेक्स्टाईल पार्क त्या ठिकाणी मंजूर झाला आहे. मागच्या काळात अमरावतीतील टेक्सटाईल पार्क साठी इकोसिस्टीम तयार केली होती. एक मोठा टेक्स्टाईलझोन तयार केला आहे. अनेक उद्योग तिथे आलेले आहेत. या ठिकाणी टेक्स्टाईल पार्क आल्यामुळे किमान १० हजार कोटींची गुंतवणूक, एक लाख लोकांना थेट आणि दोन लाख लोकांना अप्रत्यक्ष असा ऐकूण तीन लाख लोकांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा आहे ते फडणवीस म्हणाले.
शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था बदलेल
या पार्कमुळे तेथे मोठ्या प्रमाणावर समृद्धी येईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कॉटन बेल्ट आहे कॉटन बेल्ट मध्ये अशा प्रकारचा पार्क आल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा मिळेल या पार्कमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थव्यवस्था बदलण्यासाठी देखील एक मोठी महत्त्वाची मदत होणार आहे. मी माननीय पंतप्रधान यांचे महाराष्ट्र शासनाच्यावतीने मनापासून आभार मानतो असे फडणवीस यांनी सांगितले.
हे ही वाचा:
‘भल्लालदेव’ डागुबट्टीच्या उजव्या डोळ्यावर झाली शस्त्रक्रिया, किडनीही बसवली
लालबागमध्ये आईची निर्घृण हत्या करणारी तरुणी होती सँडविच विकणाऱ्याच्या संपर्कात
धीरेंद्र कृष्ण शास्त्री मिरारोडमध्ये; काँग्रेस, अंनिस म्हणतात कार्यक्रम होऊ देणार नाही
मुंबई सेंट्रल स्थानकाचा स्लॅब कोसळला, जीवीतहानी टळली
येथे आहे टेक्स्टाईल पार्क
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे हा भव्य टेक्स्टटाईल पार्क उभारण्यात आला आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन होते. त्यामुळे वस्त्रोद्योगाच्या दृष्टीने मोठी क्षमता महाराष्ट्रात आहे. विदर्भातील अमरावती विभागात सुद्धा कापसाचे मोठे उत्पादन होते. त्यामुळे कापूस उत्पादकांना तेथेच उत्पादनाच्या विक्रीची हमी आणि चांगला भाव मिळावा, या उद्देशातून टेक्स्टाईल पार्कच्या संपूर्ण पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात आली आहे.