पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केंद्र सरकारच्या रोजगार मेळावा योजनेंतर्गत ७१,००० तरुणांना नियुक्तीपत्रे दिली.
विविध राज्यांतील या सर्व तरुणांना केंद्र सरकारच्या खात्यांमध्ये नोकरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तरुणांना मार्गदर्शन केले. मी नेहमीच स्वतःला विद्यार्थी समजत आलो आहे. मला सर्व काही येतं आणि मला आता काहीही शिकण्याची गरज नाही असे मला कधीही वाटत नाही. तुम्ही पण सर्व काही शिकलात असे कधीही समजू नका. शिकण्यासाठी नेहमी तयार रहा असे मौलिक मार्गदर्शन पंतप्रधानांनी मेळाव्याला उपस्थित तरुणांना यावेळी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, आज तरुणांसमोर अशी अनेक क्षेत्रे तरुणांसमोर खुली झाली आहेत, जी १० वर्षांपूर्वी उपलब्ध नव्हती. स्टार्टअपचे उदाहरण आपल्यासमोर आहे. आज भारतातील तरुणांमध्ये याबाबत प्रचंड उत्साह आहे. स्टार्टअपने ४० लाखांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. ड्रोन क्षेत्रातही अशीच स्थिती आहे. गेल्या ८-९ वर्षांत देशातील क्रीडा क्षेत्रालाही नवसंजीवनी मिळाली असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. कोविडनंतर संपूर्ण जगाला मंदीचा सामना करावा लागत आहे, बहुतेक देशांची अर्थव्यवस्था सतत घसरत आहे. असे असूनही जग भारताकडे एक चमकता तारा म्हणून बघत आहे याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.
भांडवली खर्च वाढवल्याने रोजगाराच्या संधी वाढल्या
रोजगार निर्मितीचा आणखी एक पैलू म्हणजे सरकारने पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये केलेली गुंतवणूक असे सांगून पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, सरकार जेव्हा भांडवली खर्च करते तेव्हा रस्ते, रेल्वे, बंदरे यासह अनेक गोष्टी मोठ्या प्रमाणावर तयार केल्या जातात. गेल्या ९ वर्षात देशातील भांडवली खर्च चार पटीने वाढला आहे. यामुळे रोजगाराच्या संधी तर वाढल्याच, पण लोकांचे उत्पन्नही वाढले.
‘आत्मनिर्भर भारत’ रोजगार निर्मितीची मोहीम ‘
आत्मनिर्भर भारत मोहिमे’चा विचार आणि दृष्टिकोन हा स्वदेशीचा स्वीकार आणि व्होकल फॉर लोकल पेक्षाही खूप काही अधिक आहे. भारतात खेड्यापासून शहरांपर्यंत कोट्यवधी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची ही मोहीम आहे. आज आधुनिक उपग्रहांपासून सेमी हायस्पीड ट्रेन्सपर्यंत सर्व काही फक्त भारतातच बनवले जात आहे. २०१४ पूर्वी, रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण होण्यासाठी ७ दशके लागली. २०१४ नंतर आम्ही ९ वर्षांत ४०हजारांपेक्षा जास्त लांबीच्या रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण केले असे पंतप्रधानांनी सांगितले.
हे ही वाचा:
राहुल गांधींच्या विरोधात ‘सावरकर’ न्यायालयात
गडकरींना धमकी देणाऱ्या जयेश पुजारीवर युएपीए अंतर्गत कारवाई
ढलती का नाम महाविकास आघाडी मन्नू तेरा हुवा, अब मेरा क्या होगा?
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ‘आंबेडकर यात्रा ट्रेन’
खेळणी उद्योगाच्या पुनरुज्जीवनामुळे रोजगाराच्या संधी वाढल्या
अनेक दशकांपासून भारतातील मुले परदेशातून आयात केलेल्या खेळण्यांसोबत खेळत आहेत.आम्ही आयात केलेल्या खेळण्यांसाठी गुणवत्तेचे मापदंड निश्चित केले आणि स्वदेशी उद्योगाला चालना देण्यास सुरुवात केली. गेल्या तीन-चार वर्षात खेळणी उद्योगाला नवसंजीवनी मिळाली आणि रोजगाराच्या अनेक नवीन संधी निर्माण झाल्या.
या क्षेत्रात रोजगाराच्या संधी मिळाल्या
पंतप्रधान कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार देशभरातील निवडक तरुण ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, सीनियर कमर्शियल कम तिकीट क्लर्क, इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफर, कनिष्ठ लेखापाल, पोस्टल असिस्टंट, आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, वरिष्ठ पदासाठी पात्र आहेत. ड्राफ्ट्समन, भारत सरकार अंतर्गत पर्यवेक्षक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक, ग्रंथपाल, परिचारिका, प्रोबेशनरी ऑफिसर अशा विविध पदांवर नियुक्ती केली जाईल.