भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोदावरी नदीच्या तीरावर नाशिक इथं स्थित पौराणिक रामकुंडावर भारताला राष्ट्रगुरू करण्याचा संकल्प घेतला आहे. गोदापूजन आणि संकल्प यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे अर्धातास रामकुंडावर उपस्थित होते. रामकुंड येतील गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्या मार्गदर्शनानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पूजाविधी आणि संकल्प पुरणोक्त पद्धतीने केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोभावे सर्व पूजाविधी संपन्न केला व त्यावेळी उपस्थित ब्रह्मवृंदाचे आशीर्वाद घेतले. पंतप्रधान मोदी यांनी केलेला पुरणोक्त संकल्प संस्कृतमध्ये असून त्याचा मराठी भावानुवाद पुढील प्रमाणे आहे.
“माझ्याकडून भारतमातेची कायम सेवा घडो. भारताच्या शत्रूचे प्रयत्न निष्प्रभ करण्याचे आणि भारताला सर्वोच्च स्थानावर नेण्याचे बळ मला मिळो. माझ्या हातून सतत देव, देश आणि धर्मकार्य घडो. भारतातील प्रत्येक घटकाची माझ्या हातून सेवा घडो. कृषिप्रधान भारत सुयोग्य पर्जन्यवृष्टी द्वारा सुजलाम् सुफलाम् होवो. भारतावर अनारोग्याचे संकट कधीही न येवो. सर्व भारतीय जीवांचे कल्याण घडवण्यासाठी माझ्या हातून सतत कार्य घडावे. यासाठी माता गोदावरी, भगवान कपालेश्वर सहित सर्व इष्ट देवतांनी मला बल प्रदान करावे.”
हे ही वाचा:
जय श्रीराम: रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बोलावणार हुतात्मा कारसेवकांच्या कुटुंबियांना
‘डीपफेक’प्रकरणी येत्या सात ते दहा दिवसांत आयटी नियमांत सुधारणा!
दक्षिण आफ्रिकेचा इस्रायलवर नरसंहाराचा आरोप!
इंडिया गटाला धक्का; जागावाटपाबाबत काँग्रेसशी चर्चा करण्यास तृणमूलचा नकार
विशेष म्हणजे या संकल्पाच्या निमित्ताने आयोध्येत होऊ घातलेल्या भव्य श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे कार्य निर्विघ्नपणे संपन्न व्हावे असे आशीर्वादही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प करताना सर्व देवतांकडे मागितले आहेत.
या निमित्ताने उपस्थित पुरोहित संघाचे पदाधिकारी पुढील प्रमाणे
सतीश शंकर शुक्ल, प्रधान आचार्य तथा अध्यक्ष, पुरोहित संघ, रामकुंड, नाशिक
दिलीप वामन शुक्ल
चंद्रशेखर नंदकुमार पंचाक्षरी
प्रतिक सतीश शुक्ल
वैभव नारायण दिक्षित
चंद्रशेखर रघुनाथ गायधनी
शेखर शंकर शुक्ल
अतुल मोरेश्वर गायधनी
अमित नारायण पंचभैये
वैभव प्रभाकर बेळे
भालचंद्र एकनाथ शौचे
उपेंद्र अरविंद देव