पंढरपूरच्या पालखी मार्गाचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ऑनलाइन करण्यात आले. त्यावेळी पंतप्रधानांनी उपस्थित वारकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी मोदींनी वारकऱ्यांकडून तीन आशीर्वाद मागितले आहेत. पहिला आशीर्वाद, वारीच्या मार्गावर दोन्ही बाजूंनी झाडे लावा जेणेकरून वारकऱ्यांना वारीच्यावेळी सावली मिळेल. दुसरा आशीर्वाद म्हणजे वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे. त्याचबरोबर पंढरपूरला सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्र बनवण्याचा आशीर्वादही मोदींनी मागितला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हीसीवरून संवाद साधला. तर पालखी मार्ग भूमिपूजन कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पंढरपुरात दाखल झाले होते. याप्रसंगी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री कपिल पाटील, रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के सिंग, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, भाजपचे प्रदेश्याध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप आमदार खासदार उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. मोदींनी राम कृष्णहरी… राम कृष्णहरी म्हणत कार्यक्रमाची सुरुवात केली. शंकराचार्यांनी सांगितलं आहे की, पंढरपूरला आनंदाचंही प्रत्यक्ष स्वरुप आहे. आज त्यात सेवेचा आनंदही मिसळला आहे. मला आनंद होत आहे संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गाचा शुभारंभ होत आहे. वारकऱ्यांना सुविधा मिळणार आहे. पंढरपुराकडे जाणारे हे मार्ग भागवत धर्माची पताका आणखी उंचावतील, असं मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री बदलूनही सिद्धू विरुद्ध पंजाबचे मुख्यमंत्री मालिका सुरूच
दोन वर्षांत पेट्रोल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती समान
कंगना, सिंधूसह १०२ मान्यवरांना पद्म पुरस्कार
दिंडीत जातपात नसते. भेदाभेद नसतो. सर्व वारकरी गुरुबंधू आहेत. वारकऱ्यांची एकच जात आहे. एकच गोत्रं आहे. ते म्हणजे विठ्ठल गोत्रं आहे. मी जेव्हा सबका साथ, सबका विकास म्हणतो त्याच्यामागे हीच भावना असते. हीच महान परंपरा असते. सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या विकासासाठी प्रेरित करते. पंढरपूरची आभा, अभिव्यक्ती सर्व काही अलौकीक आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.