ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा पंतप्रधान मोदींकडून निषेध !

लोकशाहीत आणि राजकारणात हिंसेला स्थान नाही, पंतप्रधान मोदी

ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा पंतप्रधान मोदींकडून निषेध !

अमेरिकेचे माजी अध्यक्ष व अमेरिकेच्या यंदाच्या अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. शनिवारी (१३ जुलै) पेन्सल्व्हेनिया येथे निवडणूक प्रचाराच्या एका कार्यक्रमाला संबोधित करत असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केला. या हल्ल्यात ते जखमी झाले. हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी पोस्ट करत, माझ्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला गोळी चाटून गेल्याचे त्यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी या हल्ल्याचा निषेध करत लोकशाहीत आणि राजकारणात हिंसेला स्थान नसल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी हल्ल्याचा निषेध करत ट्रम्प लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली. पंतप्रधान मोदी ट्विट करत म्हणाले, माझे मित्र व अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे मी चिंतेत आहे. मी या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. राजकारण व लोकशाहीत हिंसेला थारा नाही. ट्रम्प लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करेन. आम्ही या हल्ल्यात निधन झालेल्या लोकांच्या कुटुंबियांबरोबर आहोत. तसेच या हल्ल्यात जखमी झालेले अमेरिकन नागरिक लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो.

हे ही वाचा:

खदखदीमुळे गेम झाला !

अंबानींच्या विवाह सोहळ्यात इंडी आघाडीचे वऱ्हाड

अंबानी पुत्राच्या शाही विवाहसोहळ्यात दोन संशयितांची घुसखोरी, दोघांवर गुन्हे दाखल

देशाला दिशा देण्याच्या कामात मीडियाचा महत्वाचा रोल!

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबारानंतर लगेचच स्नायपरने हल्लेखोराला ठार केले. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (एफबीआय) हल्लेखोराच्या ओळखीबाबत मोठा खुलासा केला. हल्लेखोर हा २० वर्षीय थॉमस मॅथ्यू असल्याचे एजन्सीने सांगितले आहे.

Exit mobile version