देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येसोबतच मृत्यूदरातही झपाट्यानं वाढ होत आहे. कोरोनामुळे ओढावलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशातील परिस्थितीचा सर्वसमावेशक आढावा घेतला. यादरम्यान, त्यांनी देशातील राज्यांची आणि जिल्ह्याची कोरोना परिस्थिती जाणून घेतली. याव्यतिरिक्त पंतप्रधानांनी ज्या राज्यांतील परिस्थिती अत्यंत बिकट आहे, त्या-त्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली. पंतप्रधानांनी तेलंगणा, आँध्रप्रदेश, ओडिशा आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली.
देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना पंतप्रधानांना त्या राज्यांबाबात माहिती देण्यात आली, जिथे १ लाखांहून अधिक रुग्ण आहेत. तसेच पंतप्रधानांना कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित असणाऱ्या देशातील जिल्ह्यांबाबतही सांगण्यात आलं. पंतप्रधानांना राज्यांद्वारे आरोग्य सेवा मजबूक करण्यासाठी केल्या जाणाऱ्या तयारीसंदर्भातही माहिती दिली गेली.
आढावा घेतल्यानंतर पंतप्रधानांनी आरोग्य सेवां आणखी मजबूक करण्यासाठी काम करण्यात यावं, असे निर्देश दिले. याव्यतिरिक्त जलद आणि सर्वांगीण प्रतिबंधात्मक उपाययोजना सुनिश्चित करण्याच्या गरजेवरही चर्चा करण्यात आली.
हे ही वाचा:
मुंबईत लवकरच १४ ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरु
शिवसेनेचा ‘हा’ बडा नेता भाजपाच्या वाटेवर
रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबणार
केंद्रानं राज्यांना कोरोनामुळे प्रभावित झालेल्या जिल्ह्यांची ओळख पटवण्यासाठी एक ऍडवायझरी पाठवण्यात आली होती. जिथे कोरोना रुग्णांची संख्या १० टक्के किंवा त्याहून अधिक आहे आणि ऑक्सिजन बेड्स ६० टक्क्यांहून अधिक भरलेले आहेत. त्या जिल्ह्यांची वेगळी वर्गवारी करण्यासाठी सांगण्यात आलं होतं. तसेच पंतप्रधानांनी औषधांच्या उपलब्धतेचाही आढावा घेतला. त्यांनी रेमडेसिवीरसह इतर औषधांच्या उत्पादनात वाढ करण्याबाबत सुरु असेलल्या प्रयत्नांबाबतही माहिती देण्यात आली.