34 C
Mumbai
Thursday, October 31, 2024
घरविशेषपंतप्रधान मोदींनी कच्छमधील बीएसएफ जवानांसोबत साजरी केली दिवाळी

पंतप्रधान मोदींनी कच्छमधील बीएसएफ जवानांसोबत साजरी केली दिवाळी

जवानांना शुभेच्छा देत खाऊ घातली मिठाई

Google News Follow

Related

दिवाळीनिमित्त देशभरात उत्साह असताना आपल्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैन्यालाही दिवाळीचा आनंद लुटता यावा यासाठी देशाचे पंतप्रधान थेट जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पोहचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे. राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी गुजरातमधील कच्छमध्ये पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएसएफचा ड्रेस परिधान केला असून त्यांनी यावेळी जवानांना मिठाई खाऊ घातली. पंतप्रधान मोदी अनेक वर्षांपासून सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत.

सणांच्या दिवशीही आपले जवान देशाचे रक्षण करण्यासाठी आपल्या कुटुंबीयांपासून मैलो दूर देशसेवेचे कर्तव्य पार पाडत असतात. अशा परिस्थितीत दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या कच्छमध्ये पोहोचले. त्यांनी सर्व जवानांचे भेट घेत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच या आनंदच्या क्षणी त्यांना मिठाई खाऊ घातली.

कच्छ जिल्ह्यातील लकी नाला येथे पंतप्रधान मोदींनी दिवाळी साजरी केली. हे ठिकाण अतिशय दुर्गम असून येथे दिवसा अत्यंत उष्णता असते तर रात्री अतिशय थंडीचे वातावरण असते. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या गुजरातच्या सर्वात मोठ्या जिल्ह्याच्या चौकीवर पंतप्रधान मोदींनी जवानांशी चर्चाही केली.

हे ही वाचा : 

सैन्य मागे घेतल्यानंतर दिवाळीनिमित्त भारत- चीन सैनिकांमध्ये मिठाईची देवाणघेवाण

आमदार जयश्री जाधवांचा काँग्रेसला रामराम; शिवधनुष्य घेतले हाती

बेरोजगार असलेल्या ५६ वर्षीय मुस्तफाने दिली होती सलमानला धमकी, केली अटक

दिवाळीनिमित्त पंतप्रधान मोदींनी निरोगी, आनंदी आयुष्यासाठी दिल्या शुभेच्छा

२०१४ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हापासून नरेंद्र मोदी देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात तैनात असलेल्या जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. त्यांनी २०१४ मध्ये सियाचीन, २०१५ मध्ये पंजाब सीमा, २०१६ मध्ये हिमाचल प्रदेशातील सुमदो, २०१७ मध्ये जम्मू- काश्मीरमधील गुरेझ सेक्टर, २०१८ मध्ये उत्तराखंडमधील हरसिल, २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधील राजौरी आणि २०२० मध्ये राजस्थानमधील लोंगेवालाला येथे भेट दिली होती. तर, पंतप्रधान मोदींनी २०२१ ची दिवाळी काश्मीरमधील नौशेरा, २०२२ ची जम्मू- काश्मीरमधील कारगिल आणि २०२३ ची हिमाचलमधील लेपचा येथे साजरी केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा