26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषकोकणच्या मदतीला दिल्ली तत्पर

कोकणच्या मदतीला दिल्ली तत्पर

Google News Follow

Related

कोकणात पावसाने रौद्ररूप धारण केले असून कोकणातील गावे ही पाण्याखाली गेली आहेत. या संपूर्ण परिस्थितीची केंद्र सरकारकडून तात्काळ दखल घेत मदत पाठवण्यात आली. सुरवातीला या संपूर्ण बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या तुकड्या पाठवण्यात आल्या. तर आता थेट नौदलाला बचावकार्यासाठी पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या साऱ्या परिस्थिती संदर्भात चर्चा केली आहे.

कोकणतल्या पावसाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जलप्रलय पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असून गावंच्या गावं पाण्याखाली बुडाली आहेत. महाडला पूर येऊन रस्त्यावर सात ते आठ फूट पाणी साचले आहे. तर चिपळुणात १०-१५ फूट पाणी साचल्याचे समजते. या परिस्थितीत कोकणात अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

चिपळुणात पूरपरिस्थिती, कोकणात हाहाकार

चीनमध्ये १०० वर्षातला सर्वाधिक पाऊस, लाखो लोकांना केलं स्थलांतरित

चीनमध्ये पुरामुळे २५ पेक्षा जास्त मृत्यू

ऑलिंपिकच्या उद्घाटनाची प्रतीक्षा… भारतीय खेळाडू सज्ज!

केंद्र सरकारकडून या साऱ्या परिस्थितीची तात्काळ दखल घेत एनडीआरएफच्या तुकड्या पाठवण्यात आल्या. या तुकड्यांच्या सहाय्याने बचावकार्याला सुरुवात झाली. तर परिस्थिती अतिशय गंभीर असल्यामुळे एनडीआरएफच्या तुकड्यांच्या बरोबरीने नौदलालाही पाठवण्यात आले आहे. सुरवातीपासूनच नरेंद्र मोदी यांच्या सरकारने या मुसळधार पावसाच्या आणि पुर परिस्थितीत महाराष्ट्राला मदत पाठवली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा करत आवश्यक त्या सर्व मदतीचे आश्वासन दिले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा