मिलेट्स मॉम शर्मिला ओस्वाल यांची १०० पेक्षा जास्त भरड उत्पादने उतरली पसंतीला

'मन की बात" मध्ये पंतप्रधानांकडून आवर्जून उल्लेख

मिलेट्स मॉम शर्मिला ओस्वाल यांची १०० पेक्षा जास्त भरड उत्पादने उतरली पसंतीला

‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १०० व्या भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरड धान्याच्या प्रचारामध्ये कार्यरत असलेल्या शर्मिला ओस्वाल यांचा उल्लेख केला. संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे चालू वर्ष भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. जगभरात भरड धान्याचा प्रसार व प्रचार सुरु असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्याचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या विशेष प्रयत्नानेच भरड धान्याचा जगभर प्रसार होत आहे. गंमत म्हणजे शर्मिला या गेल्या २० वर्षांपासून भरड धान्याचे महत्व पटवून देत आहे. गेल्या २० वर्षात आजपर्यंत भरड धान्याच्या १०० पेक्षा जास्त उत्पादने ओसवाल यांनी बाजारात आणली आहेत. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी ओसवाल यांचा आवर्जून उल्लेख केला.

 

कोकणातील अलिबाग यथे राहणाऱ्या शर्मिला ओसवाल यांनी हॉवर्ड युनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्या पार्ट आपल्या गावाला आल्या. देशातील लोकांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी भरडधान्याची लागवड सुरू केली आणि नंतर बाजरीची उत्पादने बाजारात आणली.

 

शर्मिला ओसवाल यांच्या म्हणण्यानुसार ज्वारी, बाजरी, नाचणी हीच प्रमुख भरड धान्ये असून तेच खरे आपले अन्नधान्य आहे. गहू, बासमती तांदूळ हे आपले अन्नधान्य नाही. परंतु, चुकीच्या समजुतीतून आपण आपले स्थानिक अन्नधान्य खाण्याचे टाळत आहोत. त्यामुळे पूर्वीच्या पिढीपेक्षा आताच्या पिढीची रोग प्रतिकारकशक्ती कमी आहे.

 

कोरोना महामारीमध्ये नागरिकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती कमी असल्याचे निदर्शनास आले.येणाऱ्या काळात कोरोनासारख्या अनेक साथीच्या आजारांची शृंखलाच येणार आहे. त्या परिस्थितीत रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम केवळ भरड धान्य करू शकणार आहे. आणि ही रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याची क्षमता भारतात आहे असे ठाम मत ओसवाल यांचे आहे. अलिबाग जवळच्या केनाड गावच्या मिलेट मॉम म्हणून ओळखलेल्या शर्मिला ओसवाल यांनी गेल्या २० वर्षांत बाजरीच्या उत्पादनात नाविन्यपूर्ण योगदान दिले आहे.शेतकऱ्यांना स्मार्ट शेतीचे तंत्र त्यांनी शिकवले. त्यांच्या प्रयत्नांमुळे बाजरीचे उत्पादनच नाही तर शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढले आहे.

कोरोनंतर बाजरीची उत्पादने बाजारात

शर्मिला ओसवाल आधीपासूनच बाजरीची लागवड करत होत्या., परंतु तिच्या जवळच्या अनेक लोकांचा कोरोनामध्ये मृत्यू झाला. त्यानंतर मात्र लोकांचे आरोग्य चांगले राहावे या निर्धारातून त्यांनी बाजरीची उत्पादने बाजारात आणण्याचे ठरवले.सध्या बाजरीची जवळपास १०० उत्पादने त्यांनी बाजारात आणली आहे. यातील. मॅगी, पास्ता, कॉर्न, कुरकुरीत ही उत्पादने सर्वांच्याच पसंतीस उतरली आहेत.

हे ही वाचा:

गाढवाशी वाद, अर्थात मालवणी वस्त्रहरण

दोन महिलांच्या भांडणानंतर गोळीबार, एका महिलेने गमावला जीव

दंतेवाड्यात दोन महिने आधीच पेरण्यात आली होती स्फोटके !

शंभरीतली ‘मन की बात’आणि मोदींना दिलेल्या ९१ शिव्या  

पंतप्रधानांबरोबरची संस्मरणीय भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मन की बात या कार्यक्रमात अशा व्यक्तींची भेट घालून देतात कि त्याबद्द्ल कधी कोणी ऐकलेले नसते. खुद्द त्या व्यक्तीलाही आपल्या कामाची दाखल घेतली जात आहे याची माहिती नसते. शर्मिला ओसवाल यांच्याबाल असेच काही काहीसे घडले. ओसवाल यांना अचानक एक फोन आला. फोन करणार्‍याने पंतप्रधान कार्यालयातून बोलत आहोत . देशाच्या पंतप्रधानांना आपल्याशी बोलायचे आहे असे सांगितले. ओसवाल यांचा त्यावर विश्वास बसला नाही. त्यांना कोणीतरी सायबर गुन्हेगार असून आपली फसवणूक करत आहे असे वाटले. त्यामुळे त्यांनी एकदा नाही तर दोन तीन वेळा बोलण्यास नकार दिला. त्यांच्या पटीने फोन करून खात्री केली त्यानंतर शर्मिला ओसवाल यांचा विश्वास बसला. त्यानंतर एकदा नाही तर बऱ्याचदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर भेट झाली आहे.

Exit mobile version