रायगडमध्ये तळई येथे झालेल्या अपघाताची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळई येथे झालेल्या दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाग येऊन त्यांनी त्यांनी देखील आर्थिक मदत जाहीर केली आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळई या गावी गुरुवारी संध्याकाळी दरड कोसळली. मुसळधार पावसामुळे ३५ घरांवर दरड कोसळली. ज्यामध्ये दरड कोसळून तब्बल ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारमार्फत गंभीर दाखाल घेतली गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तर या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली आहे.
हे ही वाचा:
लोकल सुरू करा! भाजपाचे सविनय नियमभंग आंदोलन
ऑलीम्पिकला दिमाखात सुरुवात; भारतीय पथकाने केले संचलन
चिपळूणमध्ये ऑक्सिजन अभावी ८ रुग्णांचा मृत्यू
डोंगरउतारावरील झोपड्यांवर सर्वाधिक धोक्याचे सावट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून या संबंधीचे ट्विट करण्यात आले आहे.
PM @narendramodi has announced an ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF for the next of kin of those who lost their lives due to a landslide in Raigad, Maharashtra. Rs. 50,000 would be given to the injured.
— PMO India (@PMOIndia) July 23, 2021
केंद्र सरकारने मदत जाहीर केल्या नंतर महाराष्ट्रातील ठाकरे सरकारही खडबडून जागे झाले आणि मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली. तर जखमींवरती मोफत उपचार केले जाणार आहेत.
अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत व जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 23, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या तत्परतेसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील तळई येथे घडलेल्या भीषण दुर्घटनेतील मृत आणि जखमींसाठी तात्काळ मदत जाहीर केल्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे ऋण व्यक्त करतो.”
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील तळई येथे घडलेल्या भीषण दुर्घटनेतील मृत आणि जखमींसाठी तात्काळ मदत जाहीर केल्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे ऋण व्यक्त करतो. @PMOIndia
— Narayan Rane (@MeNarayanRane) July 23, 2021