दिवाळीनिमित्त पंतप्रधान मोदींनी तरुणांना देणार ही भेट

पंतप्रधान मोदींनी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी

दिवाळीनिमित्त पंतप्रधान मोदींनी तरुणांना देणार ही भेट

दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील तरुणांना गिफ्ट देणार आहेत. शनिवार, २२ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशातील तरुणांशी संपर्क साधणार आहेत.

देशातील ७५ हजार तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत.या ७५ हजार तरुणांना पंतप्रधान मोदी नोकरीचे प्रमाणपत्र सुपूर्द करणार आहेत.

या कार्यक्रमात देशातील विविध शहरातील केंद्रीय मंत्रीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान ओरिसातून, मनसुख मांडविया गुजरातमधून, अनुराग ठाकूर चंदिगडमधून, पीयूष गोयल महाराष्ट्रातून सहभागी होणार आहेत. याशिवाय अन्य मंत्रीही विविध शहरांतून सहभागी होणार आहेत. सर्व खासदार आपापल्या लोकसभा मतदारसंघातून कार्यक्रमात सामील होणार आहेत.

यावर्षी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांचा आढावा घेतला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी घोषणा केली होती की त्यांचे सरकार पुढील दीड वर्षात म्हणजे २०२३ डिसेंबरपर्यंत दहा लाख नोकऱ्या देणार आहे. पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर या दिशेने काम सुरू झाले. आता त्याच अनुषंगाने पंतप्रधान शनिवारी ७५ हजार तरुणांना रोजगार पत्र देणार आहेत.

हे ही वाचा:

आशिया कप क्रिकेटसाठी भारताची पाकिस्तानवर फुली

‘ठाकरे कुटुंबियांचे उत्पन्न आणि संपत्तीचा मेळ लागत नाही’

युक्रेनवरील रशियन हवाई हल्ल्यात चार ठार

पीएफआयला राम मंदिर पाडून बाबरी मस्जिद बांधायची होती

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ ऑक्टोबर रोजी अयोध्येला जाणार आहेत. येथे ते प्रभू रामलला विराजमान यांची पूजा करून दर्शन घेणार असून, रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या जागेची पाहणीसुद्धा करणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी प्रभू रामाच्या राज्य अभिषेकाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी भव्य दीपोत्सव सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version