आईबहिणीवरून शिवीगाळ करू नका! त्याविरोधात आवाज उठवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले तरुणांना आवाहन

आईबहिणीवरून शिवीगाळ करू नका! त्याविरोधात आवाज उठवा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ जानेवारीला महाराष्ट्र भेटीत स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने युवकांना महत्त्वाचे संदेश दिले. पंतप्रधानांनी प्रथम नाशिकमध्ये काळाराम मंदिरात दर्शन घेतले आणि नंतर केलेल्या भाषणात प्रामुख्याने युवकांना मार्गदर्शन केले.

युवकांना सल्ला देताना मोदी म्हणाले की, युवकांनी नशेपासून दूर राहायला हवे. आईबहीण मुलगीच्या नावाने अपशब्द वापरू नका, शिवीगाळ करू नका. अशा शिव्या देण्याच्या सवयीविरोधात आवाज उठवा. हे प्रकार बंद व्हायला हवेत. आज मी पुन्हा आग्रह धरत आहे. याआधीही लाल किल्ल्यावर भाषण करताना मी हा आग्रह केला होता.

हे ही वाचा:

दक्षिण आफ्रिकेचा इस्रायलवर नरसंहाराचा आरोप!

वर्षभरात अयोध्येत ३१ कोटी पर्यटक, प्राणप्रतिष्ठेनंतर महापूर!

स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिवस…विचारांचा जागर

पश्चिम बंगालचे नाव बदला…ममता बॅनर्जी यांची मागणी!

युवा महोत्सवाच्या आयोजनानिमित्त ते बोलत होते. ते म्हणाले की, भारताच्या अमृतकाळात युवकानो तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. देशाला तुम्ही नव्या उंचीवर न्यायचे आहे. असे काम करून दाखवा की, पुढच्या पिढ्या तुमचे स्मरण करेल. आजही आपल्याला क्रांतिकारकांची आठवण आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाला सामाजिक सशक्तीकरणाचा आधार मानले. महापुरुषांनी देशासाठी कार्य केले. ते देशासाठी जगले, देशासाठीच त्यांनी प्राणांची आहुती दिली. मोदी म्हणाले की, तुम्ही २१ व्या शतकातील भाग्यशाली पिढी आहात. तुम्ही देशाला नव्या उंचीवर नेऊ शकता. मेरा युवा भारत या संघटनेशी देशातील तरुण जोडला जात आहे. माय भारत नंतरचा हा कार्यक्रम आहे. या संघटनेत १ कोटी १ लाख तरुणांनी नोंदणी केली आहे.

त्याआधी, नरेंद्र मोदी यांना रोड शोही तिथे आयोजित करण्यात आला. नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून जोरदार स्वागत केले. भारत माता की जय म्हणत नाशिककरांनी आसमंत दुमदुमून टाकला. फुलांचा वर्षावही लोक मोठ्या प्रमाणावर करत होते.

Exit mobile version