पंतप्रधान मोदींचा नव्या १० वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा!

हे काम नाही तर हा फक्त ट्रेलर, पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदींचा नव्या १० वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (१२ मार्च) अहमदाबाद येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे १० नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.तसेच ८५ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी करून पंतप्रधान मोदींनी देशाला मोठी भेट दिली.यादरम्यान पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितले की, देशाच्या कानाकोपऱ्यात प्रकल्पांचे उद्घाटन होत आहे, नवनवीन योजना सुरू होत आहेत.येत्या ५ वर्षात तुम्हाला भारतीय रेल्वेचा असा कायापालट झालेला दिसेल, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल, आज मी देशाला याची हमी देतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ‘जर मी फक्त २०२४च्या वर्षाबद्दल बोललो तर या ७५ दिवसांत ११ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली आहे. गेल्या १०-१२ दिवसांत ७ लाख कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली आहे. आजही विकसित भारताच्या दिशेने देशाने एक मोठे पाऊल टाकले आहे.आजच्या या कार्यक्रमात १ लाख कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. त्यापैकी ८५ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीचे रेल्वे प्रकल्प आज देशाला मिळाले आहेत, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, ‘भारत हा तरुण देश आहे, येथे मोठ्या संख्येने तरुण राहतात. मी विशेषतः माझ्या तरुण मित्रांना सांगू इच्छितो की, आज जे उद्घाटन झाले आहे ते तुमच्या वर्तमानासाठी आहे आणि आज जी पायाभरणी झाली आहे, ती तुमच्या उज्ज्वल भविष्याची हमी घेऊन आली आहे.

हे ही वाचा..

काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीपासून काढला पळ?

जागावाटपावरून होणारी दिरंगाई चिंतेचा विषय

काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; आमदार प्रतिभा धानोरकरांचा गौप्यस्फोट

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा राजीनामा!

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदघाटन केलेल्या १० नवीन वंदे भारत ट्रेन या नव्या ढंगात आणि नव्या रंगात असणार आहे.या नव्या वंदे भारत ट्रेन ही भगव्या रंगाच्या आहेत.जलद गती, आरामदायी, स्वच्छ आणि वातानुकूलित कोचमुळे ही ट्रेन प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे.

लखनौ-डेहराडून, अहमदाबाद-मुंबई सेंट्रल, न्यू जलपाईगुडी-पाटणा, पाटणा-लखनौ, खजुराहो-दिल्ली (निजामुद्दीन), पुरी-विशाखापट्टणम, कलबुर्गी-सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल बेंगळुरू, रांची-वाराणसी, म्हैसूर- डॉ. एमजीआर सेंट्रल (चेन्नई), सिकंदराबाद-विशाखापट्टणम, या १० मार्गावर नवीन वंदे भारत ट्रेन आजपासून धावणार आहे.

 

Exit mobile version