पंतप्रधानांनी केली रश्मी ठाकरे यांच्या प्रकृतीची चौकशी

पंतप्रधानांनी केली रश्मी ठाकरे यांच्या प्रकृतीची चौकशी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला असल्याचे समोर आले आहे. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे दोघेही कोरोना पॉजिटिव्ह होते. आदित्य ठाकरे यांची तब्येत चांगली असून, रश्मी ठाकरे यांना दक्षिण मुंबईतल्या एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रश्मी ठाकरे यांना २३ मार्च रोजी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यांनंतर त्या मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरच क्वारंटाईन झाल्या होत्या. परंतु रश्मी ठाकरे यांना दोन दिवसांपूर्वी एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रश्मी ठाकरे यांनी कोरोना लसीचा पहिला डोस ११ मार्च रोजी घेतला होता.

हे ही वाचा:

प्रजासत्ताक दिनाच्या हिंसाचारानंतर आता शेतकऱ्यांचा संसदेवर मोर्चा?

“रक्ताचा खेळ यापुढे चालणार नाही”- मोदींचा दीदीला इशारा

सुपररस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रश्मी ठाकरे यांना केलेल्या फोनमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने एनडीएला सोडचिठ्ठी दिली होती. भाजपशी फारकत घेतल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये वितुष्ट आले होते. विधानसभेच्या अधिवेशनात भाजपा नेत्यांनी सरकारची कोंडी करायची एकही संधी दवडली नव्हती. काही भाजप नेत्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा केली होती. परंतु तरीही मोदी यांनी केलेल्या फोनबद्दल कौतूक देखील व्यक्त केले जात आहे.

या फोनबद्दल भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीटरवरून राजकीय मतभेद असतानाही दिलदारपणा शक्य असल्याचे म्हटले होते. त्यांनी ट्वीट मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या धर्मपत्नी व सामनाच्या संपादिका सौ. रश्मी ठाकरे यांच्या प्रकृतीची उद्धवजींकडे विचारपूस केली… राजकीय मतभेद असूनही दिलदारपणा शक्य आहे. हीच भाजपची संस्कृती मोदीजींनी जपली आहे… असे म्हटले आहे.

Exit mobile version