पीएम केअर्सला ५० हजार डॉलरची मदत
भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अत्यंत हिंमतीने सामना करत आहे. भारताला अनेक देशांनी मदत केली तर आहेच, परंतु त्याशिवाय अनेक व्यक्तींनी देखील मदत देऊ केली आहे. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्स याने पीएम केअर्ससाठी तब्बल पन्नास हजार डॉलरची देणगी ऑक्सिजनच्या खरेदी करण्यासाठी केली आहे.
पॅट कमिन्सने भारताच्या ऑक्सिजन खरेदीसाठी पीएम केअर्ससाठी दान देताना इतर क्रिकेट खेळाडूंना देखील दान देण्याचे आवाहन केले आहे. त्याबरोबरच भारतावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला त्याने पीएम केअर्समध्ये दान देण्यासाठी आवाहन केले आहे. यासंदर्भात पॅट कमिन्सने ट्वीटदेखील केले आहे. त्यात त्याने भारताप्रती त्याचे प्रेम देखील व्यक्त केले आहे.
— Pat Cummins (@patcummins30) April 26, 2021
हे ही वाचा:
मुख्यमंत्री बहुदा कोरोना आटोपल्यावरच प्रकट होतील
मोफत लसीकरणासाठी ठाकरे सरकार पैशाचे सोंग कुठून आणणार?
काही तासांत भारतात येणार ऑक्सिजन, अमेरिकेतून निघालं विमान
भारतात सध्या कोविडने थैमान मांडलेले असताना आयपीएल खेळवणे योग्य आहे की नाही याबाबत चर्चा चालू आहे. पॅट कमिन्सने त्याच्या ट्वीटमध्ये आयपीएल सारख्या प्लॅटफॉर्मवर खेळायला मिळणे हे भाग्य असल्याचे देखील म्हटले आहे. त्यामुळे मी पीएम केअर्समध्ये पन्नास हजार डॉलरचे दान देणार असल्याचे त्याने सांगितले आहे.
भारतात सध्या ऑक्सिजन, रेमडेसिवीर यांचा तुटवडा भासतो आहे. त्याच्याविरूद्ध संपूर्ण देश लढतो आहे. त्याला जगभरातून सहाय्य देखील लाभत आहे. देशांतर्गत काही लोकांकडून सातत्याने पीएम केअर्सबाबत प्रश्नचिन्ह उठवले जात असताना, परदेशी क्रिकेट खेळाडू पॅट कमिन्स याने पीएम केअर्समध्ये दान देत एक प्रकारे पंतप्रधान मोदींच्या कारभारावरचा विश्वासच व्यक्त केला आहे.