कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोना आणि लसीकरणासंदर्भात चर्चा केली जात आहे. कॅबिनेट सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, आरोग्य सचिव आणि डॉ. विनोद पॉल हे या बैठकीला उपस्थित आहेत.

रविवारी भारतात कोरोनाबाधित ९३,२४९ रुग्णांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी यावर्षातील एकाच दिवसातील सर्वाधिक आकडेवारी आहे. याबरोबरच देशातील एकूण कोरोनाबाधित रु्ग्णांची संख्या १ कोटी २४ लाख ८५ हजार ५०९ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकाळी आठ वाजेपर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १८ सप्टेंबरपासून कोरोनाबाधित रुग्णांची ही सर्वाधिक नोंद आहे. १८ सप्टेंबर रोजी कोरोनाबाधित ९३,३३७ रुग्णांची नोंद झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी ५१३ लोकांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या १,६४,६२३ वर गेली आहे.

देशभर सध्या ६ लाख ९१ हजार ५९७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. ही संख्या कोरोनाबाधित रुग्णांच्या एकूण ५.५४ टक्के आहे. रुग्णांचे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९३.१४ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. देशात १२ फेब्रुवारी रोजी सर्वात कमी १,३५,९२६ लोक कोरोनाबाधित होते. आकडेवारीनुसार आतापर्यंत १ कोटी १६ लाख २९ हजार २८९ लोक कोरोनामुक्त झाले आहे. तर मृत्यूचे प्रमाण १.३२ टक्के आहे.

हे ही वाचा:

लसीकरणाला प्रोत्सहन देणारे अनोखे उपाय

अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह

लॉकडाऊन करू नका, सदाभाऊ खोत यांची राज्यपालांना विनंती

मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले नियम शिवसेनाच पाळत नाही?

राज्यात काल जवळपास ५० हजार कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. एकूण २४,९५,३१५ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ४,०१,१७२ सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८४.४९% झाले आहे.

Exit mobile version