मविआच्या काळात तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांना एका खोट्या प्रकरणात गोवण्याचा डाव उघडकीस आला आहे. देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी दोन पोलीस अधिकाऱ्या दरम्यानची ऑडीओ क्लिप समोर आली होती. या प्रकरणी विधान परिषदेचे आमदार आणि भाजपा नेता प्रवीण दरेकर यांनी चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार या प्रकरणी महाराष्ट्राच्या गृह विभागाने एसआयटी स्थापित केल्याचे परिपत्र जारी केले आहे.
विधिमंडळ अधिवेशनादरम्यान प्रवीण दरेकर यांनी दोन अधिकाऱ्यांमधील संभाषणाची कथित ऑडीओ क्लिप सादर केली होती. यानुसार कथितरित्या मविआच्या काळात पोलिस अधिकारी संजय पांडे, तत्कालीन डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधात प्रकरण उभे करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी प्रवीण दरेकर यांनी चौकशीची मागणी केली होती.
हे ही वाचा :
राष्ट्रपतींवरील काँग्रेसची टिपण्णी म्हणजे देशातील १० कोटी आदिवासी बांधवांचा अपमान
असावा सुंदर चांदीचा बंगला, चंदेरी, सोनेरी लखलखता चांगला! काँग्रेस आमदाराची अफाट संपत्ती!
पूजा दानोळेच्या रूपेरी यशाने महाराष्ट्राला महिलांना विजेतेपद!
महाराष्ट्राच्या नेमबाजांनी राष्ट्रीय स्पर्धेत घेतला अचूक वेध!
त्यानुसार सखोल चौकशी करण्याकरीता सत्यनारायण चौधरी, पोलीस सह आयुक्त, कायदा व सुव्यवस्था, बृहन्मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली “विशेष तपास पथक (SIT)” स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात सरकारकडून देण्यात आली आहे. विशेष तपास पथकामध्ये राजीव जैन (पोलीस उपमहानिरीक्षक), नवनाथ ढवळे (पोलीस उपआयुक्त), आदिक राव पोळ (सहाय्यक पोलीस आयुक्त) या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.