उत्तेजक चाचणीत दोषी ठरलेले, बंदीचा कालावधी पूर्ण केलेले खेळाडू राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी पात्र ठरतील असा निर्णय क्रीडा मंत्रालयाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे अनेक खेळाडूंच्या पुरस्कारासाठीच्या आशा वाढल्या होत्या. मात्र, आता हा आदेश तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे बंदीचा कालावधी पूर्ण केलेले खेळाडू बॉक्सर अमित पंघल तसेच तिहेरी उडीतील स्पर्धक रंजीत महेश्वरी यांची पुरस्काराची प्रतिक्षा अजून लांबणार आहे.
क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन क्रीडा मंत्रालयाने १९ मे रोजी केले होते. त्यासंदर्भातील अध्यादेशात उत्तेजक चाचणीत दोषी आढळलेले, पण बंदीचा कालावधी संपलेले खेळाडू पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात असे म्हटले होते. मात्र, तीन महिन्यांच्या आतच हा निर्णय फिरवण्यात आला आहे. उत्तेजक चाचणीत दोषी ठरलेले, बंदीचा कालावधी पूर्ण केलेले खेळाडू राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी पात्र ठरतीलहा आदेश क्रीडा मंत्रालयाने किमान या वर्षाच्या पुरस्कारासाठी मागे घेतल्याचे समजते.
हे ही वाचा:
लग्नासाठी १५ स्थळे सुचविण्याचे वचन तोडले; भरावे लागले ५५ हजार
पाकिस्तान, तात्काळ पीओके सोडा!
मर्केल यांच्यानंतर जर्मनीच्या चॅन्सेलर कोण?
‘आरोग्य विभागातील भरतीच्या महागोंधळाला ठाकरे सरकार, राजेश टोपे जबाबदार’
क्रीडा मंत्रालयाने पुरस्कारासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. नव्या अध्यादेशानुसार उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्यामुळे बंदीला सामोरे गेलेले आणि चौकशी सुरू असलेले क्रीडापटू या पुरस्कारासाठी अपात्र ठरतील असे म्हटले आहे. क्रीडा मंत्रालयाने हा अध्यादेश ६ ऑगस्टला काढला होता, पण संकेतस्थळावर काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केला आहे.
उत्तेजक चाचणीत दोषी आढळलेल्या क्रीडापटूंच्या पुरस्कारावरून कोणताही वाद होऊ नये यासाठी क्रीडा मंत्रालय विशेष काळजी घेत आहे. यासंदर्भात जास्त सखोल चर्चा आवश्यक आहे असे क्रीडा मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत होते. त्यामुळे नवा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांमार्फत ‘टाइम्स वृत्त’ला समजले.