भाजपाच्या प्लाझ्मा हेल्पलाईनमुळे ३२ रुग्णांना जीवनदान

भाजपाच्या प्लाझ्मा हेल्पलाईनमुळे ३२ रुग्णांना जीवनदान

कोरोना रुग्णांना उपचारात अत्यावश्यक असणारा प्लाझ्मा मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टी, ठाणे तर्फे सुरु करण्यात आलेल्या प्लाझ्मा हेल्पलाईनमुळे ३२ रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. प्लाझ्मा हेल्पलाईन सुरु झाल्यापासून दहा दिवसांतच हेल्पलाईन उपक्रमाचा फायदा ठाणेकरांना होताना दिसत आहे. प्लाझ्मा हेल्पलाईनच्या माध्यमातून अतिदक्षता विभागातील रुग्णांना सहजपणे मोफत प्लाझ्मा उपलब्ध होत आहे.

कोविड उपचारात आवश्यक असणाऱ्या प्लाझ्मासाठीही प्रचंड शोधाशोध रुग्णाचे नातेवाईक करत असतात. त्यांना एक मदतीचा हात देण्यासाठी ठाणे भाजपातर्फ़े पुढाकार घेण्यात आला. भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे आणि भाजयुमो उपाध्यक्ष मयुरेश जोशी यांच्या संकल्पनेतून ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ३ मे रोजी या हेल्पलाईनचे अनावरण केले. या हेल्पलाईनमुळे ठाण्यातील कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची प्लाझ्मासाठी होणारी वणवण कमी होण्यास मदत होत आहे. या संपूर्ण उपक्रमाला यश मिळताना दिसत असून आत्तापर्यंत ३२ रुग्णांना याचा लाभ झाला आहे अशी माहिती मयुरेश जोशी यांनी दिली. या हेल्पलाईनमार्फत प्लाझ्मा पुरवठा करण्या सोबतच प्लाझ्मा दान करणाऱ्या नागरिकांनाही मार्गदर्शन केले जात आहे. प्लाझ्मा मिळविण्यासाठी कोरोना संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांशी संपर्क साधला जात आहे, असे श्री.जोशी यांनी सांगितले. या कार्यात महात्मा गांधी ब्लड बॅंक व वामनराव ओक रक्तपेढी यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.

हे ही वाचा:

कॅमेरामन, पत्रकारांना तत्काळ ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ घोषित करा

बार मालकांप्रमाणे शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दलही पत्र लिहा

 

‘या’ माजी आमदाराला अटक

राज्याच्या अधिकारातील सवलती तातडीने मराठा समाजाला द्या

कोरोना रुग्णांच्या तुलनेत प्लाझ्मा दान करणाऱ्या नागरिकांची संख्या कमी आहे. त्यातच वाढत्या रुग्णांमुळे प्लाझ्मा मिळविण्यात अडचणी येत होत्या. ठाण्यातील रुग्णांच्या नातेवाईकांना मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीपर्यंत प्लाझ्मा मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत होती. ती टाळण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न केले जात आहेत. कोरोना साथ आटोक्यात येईपर्यंत भाजपाकडून नागरिकांना मदत केली जाईल, असे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी सांगितले.

दरम्यान ठाणे भाजपाच्या या उपक्रमाची रुग्णांच्या नातेवाइकांकडून प्रशंसा होत आहे. “माझ्या वहिनीसाठी अर्जंट प्लाझ्मा हवा होता. भाजपाच्या प्लाझ्मा हेल्पलाईनची माहिती मिळाल्यावर लगेचच डॉक्टरांचे लेटर अपलोड केले. काही वेळातच हेल्पलाईनमधून कॉल आला. त्यांनी महात्मा गांधी रक्तपेढीमधून प्लाझ्मा उपलब्ध करून दिला. त्यामुळे आमची धावपळ टळली.” अशी प्रतिक्रिया हेल्पलाईनचा लाभ घेतलेल्या लता रोकडे यांनी दिली. तर “माझ्या वडिलांना तातडीने प्लाझ्मा देण्याची आवश्यकता होती. आम्ही मध्यरात्री उशिरा हेल्पलाईनवर माहिती कळविली. आम्हाला सकाळी फोनद्वारे तासाभरात प्लाझ्मा उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली. या मदतीबद्दल मयुरेश जोशी व भाजपाचे आभार.” असे मत हेल्पलाईनचे लाभार्थी दिपक प्रजापती यांनी व्यक्त केले आहे.

Exit mobile version