भारतात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अमेरिकेने भारताला मोठी मदत केली आहे. अमेरिकेने भारताला ३१८ ऑक्सिजन कंसंट्रेटर दिले असून या मशीन्स घेऊन एअर इंडियाच्या विमानाने अमेरिकेतून उड्डाण केलं आहे. अवघ्या काही तासातच या मशीन्स भारतात दाखल होणार असून त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग यांनी याबाबतचं ट्विट करून माहिती दिली आहे.
नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. प्रत्ये व्यक्तीचा अनमोल प्राण वाचवण्यासाठी आणि कोरोना संकटावर मात करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाकडून करण्यात आलेला हा प्रयत्न आहे, असं सिंग यांनी म्हटलं आहे.
ऑक्सिजन कंसंट्रेटर ही सामान्य हवेद्वारे ऑक्सिजन तयार करणारी मशीन आहे. ही मशीन रुग्णांसाठी एक प्रकारची जीवन संजीवनीच आहे. ऑक्सिजन कंसंट्रेटर हे गृह विलगीकरणात असलेल्यांसाठी एक चांगला पर्याय आहे. देशात बीपीएल आणि फिलिप्स या दोन मुख्य कंपन्याच या मशीनचे उत्पादन करतात. हे ऑक्सिजन कंसंट्रेटर ऑक्सिजन सिलिंडरपेक्षा खूप वेगळे असतात.
हेही वाचा:
व्हॉटसअॅप ग्रूपवरील वादग्रस्त कृतींसाठी ऍडमिन जबाबदार नाही
‘या’ चार राज्यांमध्ये १ मेपासून तरुणांना लस नाहीच
देवेंद्र फडणवीस ठाण मांडून बसले म्हणूनच नागपुरात कोरोना आटोक्यात आला- प्रविण दरेकर
भारतीय जेम्स बॉण्ड, अजित डोवाल मुत्सद्देगिरीतसुद्धा भारी
मेडिकल ऑक्सिजन कंसंट्रेटरसाठी ३० ते ६० हजार रुपयात बनवले जातात. काही पोर्टबल मशीन खूप छोट्या असतात. त्याची किंमत ३ ते ५ हजार रुपये असते. या मशीन वीज किंवा बॅटरीवर चालतात. ऑक्सिजन सिलेंडर आणि रिफलिंगच्या तुलनेत या मशीन स्वस्त आणि सुरक्षित आहेत. कंसंट्रेटर ऑक्सिजनचे नवीन मॉल्युक्लर बनवत नाहीत. तर हवेतील नायट्रोजन वेगळे करतात, त्यातून ऑक्सिजन कायम राहतो.