भारतीयांसह ३०३ प्रवाशांना निकारागुहा येथे घेऊन जाणारे विमान तीन दिवस रोखण्यात आल्यानंतर या विमानाला पुढील प्रवास सुरू करण्यास फ्रान्सने हिरवा कंदील दाखवला आहे. या परवानगीनंतर चार न्यायाधीशांनी प्रवाशांची साक्षींची नोंद करणे बंद केले आहे.
निकारगुहा जाणाऱ्या या विमानातून मानवी तस्करी होत असल्याच्या संशयामुळे गुरुवारीच वैटी विमानतळावर ताब्यात घेण्यात आले होते. या विमानात अधिक प्रवासी भारतीय असल्यामुळे हे विमान भारतात परतण्याची शक्यता आहे. तर, विमान दुबई किंवा निकारागुहा येथे जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, १० प्रवाशांनी शरणागती पत्करल्याचे समजते. मात्र त्यांच्याबाबत काय निर्णय झाला, हे समजू शकले नाही. हे विमान रोमानियाच्या चार्टर कंपनीचे आहे. हवाई वाहतूक कंपनीच्या वकिलाने मानवी तस्करीचा संशय फेटाळून लावला आहे.
हे ही वाचा:
चोर घोड्यावरून आले, पण कुत्र्यांनी पळवून लावले!
तृणमलच्या खासदाराला पुन्हा आली हुक्की; उपराष्ट्रपतींची हजारदा नक्कल करणार
जयपूर; १४ वर्षीय शाळकरी मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
अर्जेंटिनात इंधनदरात ६० टक्के वाढ; डायपर दुपटीने महाग
गुरुवारी एअरबस ए३४० हे विमान निकारगुआ येथे जात होते. या विमानातून एकूण ३०३ प्रवासी प्रवास करत होते. हे विमान इंधन भरण्यासाठी फ्रान्सच्या एका छोट्या विमानतळावर उतरले होते. याच दरम्यान फ्रान्सच्या अधिकाऱ्यांना सुगावा लागला की, यातून मानवी तस्करी केली जात आहे. यानंतर फ्रान्सच्या पोलिसांचे पथक विमानतळावर पोहोचले आणि विमान उड्डाण रोखले. तेव्हापासून हे विमान पॅरिसपासून सुमारे १५० किमी अंतरावरील वैट्री विमानतळावर थांबले होते. या प्रवाशांमध्ये ११ अल्पवयीनांचाही समावेश होता.
फ्रान्सच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्सच्या न्यायाधीशांनी प्रक्रियेतील अनियमितता असल्याच्या कारणास्तव ३०० हून अधिक प्रवाशांची सुनावणी रद्द करण्याचा निर्णय घेतला. याआधी रविवारीदेखील सर्व प्रवाशांना फ्रान्सच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. तेव्हा त्यांना ताब्यात घेण्यासंबंधीच्या कमाल कालावधीवर चर्चा झाली. चार न्यायाधीशांनी त्यांच्या प्रवासाचे उद्दिष्ट याबाबत चौकशी केली. तसेच, सर्व प्रवाशांशी चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी दिला होता. याबाबत फ्रान्समधील भारतीय दूतावासाला माहिती दिल्यानंतर त्यांनीही ते या प्रवाशांना सर्वतोपरी मदत करत असल्याचे जाहीर केले होते.