काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान कोसळले, १८ जणांचा मृत्यू !

विमानात होते १९ प्रवासी

काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान कोसळले, १८ जणांचा मृत्यू !

नेपाळची राजधानी काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका विमानाचा अपघात झाला आहे. टेकऑफ दरम्यान विमान धावपट्टीवर कोसळल्याने हा अपघात झाला. या विमानात एकूण १९ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी दुर्घटनेत १८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

सुर्या एअर लाईन या खाजगी कंपनीचे हे विमान असल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विमान पोखराला जात होते आणि सकाळी ११ च्या सुमारास हे क्रॅश झाले. विमानतळावर तैनात असलेल्या एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, विमानाच्या पायलटला रुग्णालयात नेण्यात आले आहे. विमानाला लागलेली आग विझवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अपघातस्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान बचावकार्य करत आहेत.

हे ही वाचा:

जरांगे पाटलांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी !

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा; एक जवान हुतात्मा

मालाडच्या तपोवन मंदिरातील मठाधिपतींवर प्राणघातक हल्ला !

पूजा खेडकरने आयएएस प्रशिक्षण केंद्राचा आदेश धुडकावला; अंतिम मुदत उलटूनही गैरहजर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोखराकडे जाणारे विमान टेक ऑफच्या वेळी धावपट्टीवरून घसरल्याने हा अपघात झाला. विमानात पायलटसह एकूण १९ जण प्रवास करत होते. या दुर्घटनेते १८ जणांचा मृत्यू झाला तर पायलट कॅप्टन एमआर शाक्य हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातस्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्यात आले आहे.

Exit mobile version