जपानमध्ये लँडिंगदरम्यान विमानाला भीषण आग!

विमानातील ३०० हुन अधिक प्रवासी सुखरूप

जपानमध्ये लँडिंगदरम्यान विमानाला भीषण आग!

जपानमधील टोकियो हानेडा विमानतळावर एका विमानाला आग लागल्याची घटना घडली आहे.आग एवढा मोठ्या प्रमाणात लागली होती की, विमानाच्या खिडक्यांमधून आगीच्या ज्वाळा बाहेर येत होत्या.विमानाला लागलेल्या आगीचा व्हिडिओ समोर आला आहे.आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून विमान लँडिंगनंतर दुसऱ्या विमानाला धडकल्याने आग लागल्याचा संशय आहे, असे जपानी वृत्तसंस्था एनएचके कडून सांगण्यात आले आहे.

हानेडा विमानतळावर एक विमान उतरत असताना हा अपघात झाला. जपानी मीडियानुसार, आग लागलेल्या फ्लाइटचा नंबर JAL ५१६ होता आणि या फ्लाइटने होक्काइडो येथून उड्डाण केले होते. जपान एअरलाइन्स फ्लाइट ५१६ जपानी स्थानिक वेळेनुसार १६:०० वाजता न्यू चिटोस विमानतळावरून निघाली आणि १७:४० वाजता हानेडा येथे उतरणार होती.

हे ही वाचा:

‘एका न्यायाधीशाचे श्रेय नाही, अयोध्या खटल्याचा निर्णय हा सर्वसंमत’

महाराष्ट्र पोलीस दलाची सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी

भारत सरकारने ‘तहरीक-ए-हुर्रियत’ला दहशतवादी संघटना घोषित केल्याने पाकिस्तानचा जळफळाट!

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडला ४४७.५ कोटींची जीएसटी नोटीस

जपान एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, अपघातानंतर विमानात एकच गोंधळ उडाला. आकाशात आगीचे ढग दिसू लागले. आरडाओरडा करत सर्व प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढण्यात आले.अग्निशमन दल आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले.या विमानात ३०० हून अधिक प्रवासी होते.आग लागल्यानंतर सर्व ३७९ प्रवासी आणि क्रू यांना बाहेर काढण्यात आल्याचे एअरलाइन्सने सांगितले.मात्र, विमानाला आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलेले नाही.

Exit mobile version