कुवेत इमारत आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे पार्थिव घेऊन जाणारे भारतीय हवाई दलाचे एक विशेष विमान शुक्रवारी पहाटे केरळसाठी रवाना झाले. हे विमान आज सकाळी १०.३० वाजता कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.कुवेत मधील झालेल्या दुर्घटनेत एकूण ४९ कामगारांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये ४१ जण भारतीय नागरिक होते.
मृतांमध्ये दोन उत्तर प्रदेश, २४ केरळ, सात तामिळनाडू आणि तीन आंध्र प्रदेशातील आहेत.दरम्यान, भारतीय हवाई दलाचे विशेष C-१३०J विमान शुक्रवारी सकाळी ४५ मृत भारतीयांचे मृतदेह घेऊन कोचीला पोहोचले. भारतीय दूतावासाने याबाबत माहिती दिली.परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंग हेही याच विमानातून परतल्याने दूतावासाकडून सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा..
जम्मू-काश्मीर आणि लडाख भारताचे अविभाज्य अंग!
मंदिरे पाडून अयोध्येत विकासकामे होणार नाहीत; अंडरपास बांधणार!
जम्मू-काश्मीरमधील सर्व शाळांच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीताने होणार
“नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर जिंकल्यासारखं वाटलं”
भारतीय हवाई दलाचे सुपर हर्क्युलस विमान ४५ मृतदेह घेऊन कुवेतहून निघाल्यानंतर प्रथम केरळमधील कोची येथे उतरले, कारण बहुतेक मृतक केरळमधील आहेत.त्यानंतर हे विमान दिल्लीला रवाना होईल आणि त्यानंतर उर्वरित मृतदेह तेथून संबंधित राज्यांमध्ये पाठवले जातील.दरम्यान, कुवेत सरकारने या घटनेचा तात्काळ तपास आणि कारवाईचे आश्वासन दिले आहे.