मध्य प्रदेशातील गुना येथे विमान अपघात, दोन पायलट जखमी !

इंजिनमध्ये बिघाड झाल्याने अपघाताची माहिती

मध्य प्रदेशातील गुना येथे विमान अपघात, दोन पायलट जखमी !

मध्य प्रदेशातील गुना येथे विमान क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात झाला असावा, असे सांगण्यात येत आहे. जेव्हा अपघात झाला तेव्हा विनामात दोन पायलट होते. उड्डाणानंतर अवघ्या ४० मिनिटांत हे विमान कोसळले.

हे विमान गुनाच्या एअरस्ट्रीप भागात पडले. शिव अकादमीचे असलेले विमान दोन वैमानिकांनी चाचणी उड्डाणासाठी उडवले होते. या घटनेत दोन्ही पायलट जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक दाखल झाले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांसह शिव अकादमीचे अधिकारी घटनास्थळी हजर आहेत.

हे ही वाचा..

बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या आत्याचाराविरोधात सांगलीत निषेध सभा

उपराष्ट्रपतींकडून काँग्रेस नेत्याला चपराक

अझीम प्रेमजी विद्यापीठही आता इस्रायलविरोधी प्रचाराचे मैदान

म्यानमारमधून बांगलादेशात पळून आलेल्या रोहिंग्यांवर ड्रोन हल्ला, २०० हून अधिक लोक ठार !

मध्य प्रदेश पोलिसांनी सांगितले की, एका खाजगी विमान कंपनीचे दोन आसनी विमान गुना जिल्ह्यात कोसळले असून त्यात पायलट जखमी झाले आहेत. हे विमान दुपारी १ वाजता उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या ४० मिनिटांत एअरस्ट्रिप परिसरात कोसळले. दरम्यान, अपघातस्थळाची छायाचित्रेही समोर आली असून विमानाचे दोन तुकडे झाल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान डागडुजी आणि टेस्टिंगसाठी कर्नाटकातून गुना येथे आणण्यात आले होते. या विमानाची चाचणी घेत असताना हा अपघात झाला.

Exit mobile version