उत्तर मुंबईचे उमेदवार पियुष गोयल यांनी केला लोकल रेल्वेने प्रवास

सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन

उत्तर मुंबईचे उमेदवार पियुष गोयल यांनी केला लोकल रेल्वेने प्रवास

उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झालेले भाजपाचे नेते पियुष गोयल यांनी गुरुवारी मुंबईचा दौरा केला. मुंबईत ते बोरिवली या आपल्या मतदारसंघात आले आणि त्यांनी कार्यकर्ते, नागरिकांशी संवाद साधला. भाजपाने ज्या ७२ जणांची दुसरी यादी जाहीर केली त्यात मुंबईच्या दोन भाजपा उमेदवारांचा समावेश होता. त्यात गोयल यांचे नाव आहे.

गोयल यांनी या दौऱ्यात रेल्वेने प्रवास केला आणि नागरिकांशी संवाद साधला. रेल्वेतील प्रवाशांशीही ते बोलले. गळ्यात भाजपाचा भगव्या हिरव्या रंगाचा स्कार्फ घालून ते प्रवास करत होते. सोबत मुंबई भाजपाचे प्रमुख व आमदार आशीष शेलारही होते. गोयल यांनी सर्वसामान्य प्रवाशाप्रमाणे रेल्वेप्रवास केला. केंद्रीय मंत्री असलेले गोयल यांनी लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरातही गेले. तिथे श्रीगणेशाचे दर्शन त्यांनी घेतले.

हे ही वाचा:

ममता बॅनर्जी जखमी, डोक्याला गंभीर दुखापत

मातोश्रीवर या, भाजपाचे तिकीट मिळवा

अपहरणकर्ता समजून कामगाराला जमावाकडून बेदम मारहाण!

पाटणामधील सिव्हील कोर्टात ट्रान्सफॉर्मरचा स्फोट

सिद्धीविनायक मंदिरात आपण बऱ्याच कालावधीनंतर आलो आहोत पण आपण मुंबईत राहता असताना या मंदिरात पहाटे येत असू. रांग लावून आपण दर्शनही घेतले आहे. आपल्या जीवनातील बराचसा काळ हा मुंबईत गेलेला असल्यामुळे आपल्याला मुंबईची चांगली माहिती आहे. मात्र आता मंत्री म्हणून दिल्लीत वावर असल्याने मुंबईत येणेजाणे होत नाही.

पियुष गोयल यांना मुंबई उत्तर मधून उमेदवारी जाहीर करताना येथील विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना पुन्हा संधी नाकारण्यात आली. मुंबई उत्तर पूर्व भागात मिहीर कोटेचा यांनाही उमेदवारी जाहीर झालेली आहे. गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट झाल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले होते मात्र स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेऊन शेट्टी यांची समजूत काढली.

Exit mobile version