कारगिल हिरोला पायलटचा सॅल्युट!

शौर्याचे अनोख्या पद्धतीने स्वागत

कारगिल हिरोला पायलटचा सॅल्युट!

सोशल मीडियावर व्हिडिओ युजर्स आपआपल्या आवडीचे व्हिडिओ पाहत असतात. ज्यामध्ये क्रिकेटर, सिनेकलाकार, ट्रेकर्स, फूड, भटकंती असे नानाविध व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात व्हायरल होतात. हा सुंदर व्हिडीओ @IndiGo6E च्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत २० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर १० हजार लोकांनी तो लाइक केला आहे. त्यातच मोठमोठे सेलिब्रेटी विमानाच्या इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करत असतात. त्यावेळेस सोबत असलेले प्रवासी त्यांच्याबरोबर एखादा सेल्फी घेण्यासाठी आटापीटा करताना दिसतात. पडद्यावरील, मैदानावरील हिरोंपेक्षा आपला भारत देश ज्यांना आदराने सलाम करतो, तो म्हणजे देशाच्या संरक्षणासाठी प्राणाची आहुती देतो तो म्हणजे आपला वीर सैनिक.

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. कारगिल युद्धातील वीर सैनिकाचे विमानाच्या पायलटने त्यांनी दाखविलेल्या कारगिल युद्धात दाखविलेल्या शौर्याचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. हा व्हिडिओ पाहिल्यांतर आपणालाही अभिमान वाटेल.

 

या व्हिडिओत मेजर आपल्या आसनावर बसले आहेत. विमानातील क्रू मेंबर्स, पायलट त्यांच्यासमोर उभे आहेत. त्यानंतर पायलट घोषणा करतो, आज एक अतिशय खास व्यक्ती आपल्यासोबत प्रवास करत आहे. परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर संजय कुमार. हा सन्मान देशातील फक्त २१ लोकांना देण्यात आला आहे. परमवीर चक्र हा पुरस्कार शौर्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे.

हेही वाचा : ‘ओपेनहायमर’मधील भगवद्गीता वादानंतर ‘श्रीकृष्ण’ दिग्दर्शकाच्या पाठिशी

ब्रदीनाथ महामार्ग वाहून गेल्याने १००० यात्री अडकले

१२ वर्षांपूर्वीचे प्रकरण: गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणी गोपाळ कांडा निर्दोष

१२ वर्षांपूर्वीचे प्रकरण: गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणी गोपाळ कांडा निर्दोष

हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “फ्लाइंग विथ द हिरो, सुभेदार मेजर संजय कुमार जी, परमवीर चक्र. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोकांनी कमेंट केल्या आहेत. ते म्हणताहेत, अशा वीर पुरुषांबरोबर प्रवास करणे अभिमानाची बाब आहे, देशाच्या हिरोला इतका सन्मान दिल्याबद्दल इंडिगो फ्लाइटचे आभारही मानले गेले आहेत.

Exit mobile version