वैमानिकाला विमानात हृदयविकाराचा झटका, सहवैमानिकांनी विमान उतरविले

पनामा शहरात विमान उतरवावे लागले

वैमानिकाला विमानात हृदयविकाराचा झटका, सहवैमानिकांनी विमान उतरविले

मयामी ते चिली असा प्रवास करणाऱ्या विमानातील प्रमुख वैमानिकाला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे खळबळ उडाली, पण त्याच्या सहकाऱ्याने हे विमान सुरक्षितरित्या विमानतळावर उतरविल्याने प्रवाशांचा जीव बचावला.

 

 

रविवारी रात्री हे विमान अखेर पनामा विमानतळावर उतरविण्यात आले. इव्हान अन्दौर (५६) हे या विमानाचे प्रमुख पायलट होते. एलएटीएएम एअरलाइन्सचे विमान ते संत्यागो येथे नेत होते. पण बाथरूममध्ये त्याना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यावेळी रात्रीचे ११ वाजले होते. ही घटना घडल्यानंतर विमानातील सह वैमानिकांनी तातडीने पनामा शहरातील टोक्युमेन आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान उतरविले.

 

 

या विमानात दोन डॉक्टरही होते तसेच इसादोरा नावाच्या नर्सही होत्या. त्यांनी या वैमानिकाला तात़डीने वैमानिकाला प्रथमोपचार दिले. पण ते वैमानिकाला वाचवू शकले नाहीत. त्यावेळी हे विमान खाली उतरत होते. मात्र विमान उतरल्यानंतर वैमानिकाचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांना चेकमेट करण्याचा प्रयत्न कोणाचा?

रशियाचे ‘लुना-२५’ भारताच्या ‘चांद्रयान- ३’ च्या दोन दिवस आधी पोहचणार

मविआचा पोपट मेलाय ! पण घोषणा कोण करणार ?

ईशनिंदा केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमधील चर्च आणि इमारतींची तोडफोड !

 

विमान उडाल्यानंतर ४० मिनिटांनी सहवैमानिकाने विमानात बसलेल्या लोकांना आवाहन केले की, त्यांच्यात कुणी डॉक्टर असेल तर त्यांनी तातडीने पुढे यावे. प्रमुख वैमानिकासाठी मग या डॉक्टरांनी धाव घेतली. विमान उतरल्यानंतर तातडीने ते रिकामे करण्यात आले. पनामा शहरातील हॉटेलात सर्व प्रवाशांना थांबविण्यात आले तर या विमानाची सेवा मंगळवारी सुरू करण्यात आली.

 

 

यासंदर्भात विमान कंपनीने म्हटले आहे की, विमानात कोणत्याही प्रवाशाच्या प्रकृतीविषयी काळजी घेतली जाते पण इव्हान अन्दौर यांच्यासाठी सर्व प्रकारची काळजी घेऊनही त्यांचा जीव वाचू शकला नाही. विमान कंपनीने मृत्युमुखी पडलेल्या वैमानिकाच्या कुटुंबियांचे सांत्वन केले असून त्यांच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे.

 

Exit mobile version