कबुतर जा जा जा…

कबुतरांना चणे टाकाल, तर ५०० रुपये दंड; मुंबई महापालिकेचा निर्णय

कबुतर जा जा जा…

मैने प्यार किया चित्रपटात पहिल्या प्रेमाची पहिली चिठ्ठी पोहोचवण्याचे काम कबुतर करते. परंतु हाच कबुतर आता मुंबईकरांना प्रेमाची चिठ्ठी नाहीतर डॉक्टरची चिठ्ठी घेण्यास भाग पाडतोय. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी तापदायक ठरतो आहे. अनेक आजारांना निमंत्रण देतोय. त्यामुळे मुंबई महापालिकेने मुंबईकरांच्या सृदृढ आरोग्यासाठी आता कबुतराला चणे टाकणाऱ्यांवर १०० ते ५०० रुपये दंड वसूल केला जाणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कबुतरांना चने घालण्यांवर क्लीन अप मार्शलचा वॉच असणार आहे.

मुंबईत दादर कबुतरखाना, माटुंगा, माहीम, फोर्ट या ठिकाणी कबुतरखाने आहेत. या शिवाय मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरातही अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे लोकं कबुतरांना चणे घालत असतात. या कबुतराला चणे टाकणाऱ्यांविरोधात पालिकेकडे अनेक तक्रारी केल्या जातात.

भरवस्तींमध्ये असलेल्या कबुतरखान्यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांना दमा, अस्थमा आणि श्वसनाचे आजार होत असल्याचे दिसून आले आहे. शिवाय कबुतरांचे थवे उडताना उडणारी धूळ, खाद्याची घाण, पिसे आणि दुर्गंधीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदुषणातही वाढ होते. या कबुतर खान्याविरोधात कित्येक वर्ष इथल्या नागरिकांनी आपला रोष व्यक्त आहे.

हेही वाचा :

ब्रिटिश खासदारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने

महिला न्यायाधीशाची मुख्य न्यायाधीश चंद्रचूडांकडे इच्छामरणाची मागणी!

एसआरए सदनिका पाच वर्षांनी विकण्याचा मार्ग मोकळा होणार?

लसूण चोरीच्या संशयावरून एकाची हत्या, बोरिवलीत खळबळ

एक कबुतर वर्षाला ४० पिलांना जन्म देते

वर्षोनुवर्षे कबुतरांची संख्या मुंबईत प्रचंड प्रमाणात वाढत आहे. एक कबुतराची जोडी वर्षाला ४८ पिलांना जन्म देते. ही संख्या रोखण्यासाठी खाद्यातून ओविस्टॉप हे औषध दिल्यास त्यांची प्रजनन क्षमता थांबते. हा प्रयोग स्पेनमध्ये केला जातोय. असाच प्रयोग मुंबईतही राबवल्यास नक्कीच कबुतरांची संख्या कमी होण्यास मदत होईल.

Exit mobile version