सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखोरांचे फोटो आले समोर!

मुंबई पोलिसांकडून शोध सुरु

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखोरांचे फोटो आले समोर!

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखोरांची छायाचित्रे समोर आली आहेत. एक हल्लेखोर काळ्या आणि पांढऱ्या टी-शर्टमध्ये, तर दुसरा लाल टी-शर्टमध्ये दिसत आहे. या छायाचित्रांच्या आधारे या दोघांचा शोध सुरू करण्यात आला आहे. रविवारी पहाटे मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार केला होता. हल्ल्यानंतर पोलिसांनी सलमान खान याच्या निवासस्थानाभोवती सुरक्षा वाढवली असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागला आहे. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या अज्ञातांची मोटरसायकल देखील मुंबई पोलिसांच्या हाती सापडली आहे.जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलचा देखील तपास चालू आहे.

हे ही वाचा:

गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ म्हणतो, मी झाडली सलमानच्या घरावर गोळी!

इंडी आघाडीचा जाहीरनामा देशाला दिवाळखोर बनवणारा

विम्याच्या पैशांसाठी फारुकने कुटुंबाच्या साथीने केली मानसिकदृष्ट्या विकलांगाची हत्या

बेंगळुरू स्फोटातील आरोपी अब्दुल ताहा बनला विघ्नेश आणि अनमोल कुलकर्णी

मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार केल्यानंतर आरोपी पश्चिम द्रुतगती मार्गाने दहिसरच्या दिशेने निघाले होते. पळून जाताना आरोपींनी स्थानिक लोकांना एक्स्प्रेस वेचा रस्ता विचारल्याचेही समोर आले आहे.यावरून आरोपींना मुंबईच्या रस्त्याची माहिती नसावी हे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.कदाचित हे आरोपी दुसऱ्या राज्यातील असावेत असा संशय मुंबई पोलिसांना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ५० हून अधिक सीसीटीव्हींची पडताळणी पोलिसांकडून करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात आरोपी मुंबई सेंट्रल येथून आल्याचे स्पष्ट झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल परिसरात गुन्हे शाखेचे पोलीस गस्त घालत आहेत. क्राइम ब्रँचची टीम त्या ऑटोचालकाचा जबाब नोंदवणार आहे, ज्याला आरोपींनी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेकडे जाण्याचा मार्ग विचारला होता. आरोपीचे शेवटचे लोकेशन मुंबईतील विलेपार्ले येथे दिसत आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी मेहबूब स्टुडिओमार्गे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर गेल्याची माहिती आहे.या प्रकरणी मुंबई पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.

Exit mobile version