चांद्रयान लागले कामाला; चंद्राचे फोटो पृथ्वीवर पाठवले

इस्रोकडून यासंबंधी ट्विट करत माहिती

चांद्रयान लागले कामाला; चंद्राचे फोटो पृथ्वीवर पाठवले

भारताची महत्त्वाकांक्षी अशी चांद्रयान ही मोहीम आता अंतिम टप्प्यात असून चांद्रयान- ३ ने आपले काम सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत चंद्राचे पहिले छायाचित्र समोर आले आहे. यानात बसवलेल्या कॅमेऱ्याने चंद्राचा फोटो कैद केला असून इस्रोकडून यासंबंधी ट्विट करण्यात आले आहे.

चांद्रयान- ३ पृथ्वीच्या पाच प्रदक्षिणा पूर्ण करून चंद्राच्या कक्षेत पोहोचले. यादरम्यान चंद्राजवळ प्रदक्षिणा घालताना अंतराळ यानात बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्याने चंद्राचा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओमध्ये चंद्र दिसत असून स्पेसक्राफ्टमध्ये बसवलेले सोलर पॅनल्सही दिसत आहेत. इस्रोने ट्विटरवर चंद्राची ही पहिली झलक शेअर केली आहे.

चांद्रयान- ३ हे यान १४ जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले. यानंतर यान पृथ्वीच्या पाच फेऱ्या करून चंद्राकडे रवाना झाले. चांद्रयान- ३ ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश (LOI) पूर्ण केल्यामुळे शनिवार हा मोहिमेसाठी महत्त्वाचा दिवस होता.

भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. भारताची चांद्रयान- ३ ही मोहीम यशस्वी ठरली तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. या मोहिमेसाठी भारताने तब्बल ६१५ कोटी रुपये खर्च केले आहेत.

हे ही वाचा:

नेमाडेंचा अजब इतिहास; औरंगजेबाच्या राण्यांना हिंदूंनी भ्रष्ट केले म्हणून काशीविश्वेश्वरावर हल्ला

अजितदादा, आता तुम्ही योग्य जागी बसलात !

राहुलना पुन्हा खासदारकी मिळण्याबद्दल काँग्रेसमध्ये चिंता!

‘अमृत भारत स्टेशन योजनेतून’ नवा अध्याय !

चांद्रयान- ३ ही भारताची चंद्राच्या अध्ययानासाठी पाठवलेली तिसरी मोहीम होती. याआधी पाठवलेल्या पहिल्या मोहीमेत भारताला यश आलं होतं, तर दुसऱ्या चांद्रयान मोहीमेच अंतिम टप्प्यात विक्रम लॅंडरचा अपघात झाल्याने ही मोहीम अंशत: अपयशी झाली होती.

Exit mobile version