25 C
Mumbai
Thursday, May 8, 2025
घरविशेषपहलगाम हल्ल्यातील चार दहशतवाद्यांचे फोटो आणि रेखाचित्र प्रसिद्ध!

पहलगाम हल्ल्यातील चार दहशतवाद्यांचे फोटो आणि रेखाचित्र प्रसिद्ध!

सुरक्षा दलांकडून शोध सुरु 

Google News Follow

Related

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश दुःखात आणि संतापात आहे. सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. याच दरम्यान, दहशतवाद्यांचे फोटो जारी करण्यात आले आहेत. सध्या सुरक्षा यंत्रणांनी चार दहशतवाद्यांचे फोटो आणि स्केच जारी केले आहेत. या दहशतवाद्यांची ओळख पटली असून त्यांची नावे आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी आहेत. पर्यटकांवर गोळीबार केल्यानंतर हे दहशतवादी जवळच्या डोंगराळ जंगलात लपून बसल्याचे सांगण्यात येत आहे.

हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध तीव्र करण्यात आला आहे. सध्या सुरक्षा दलांनी पहलगामच्या जंगलात शोध मोहीम तीव्र केली आहे. दहशतवादी बैसरणच्या जंगलातून आले होते. हल्ला केल्यानंतर ते जंगलातून सुरक्षित ठिकाणी पळून गेले असे मानले जाते. आता, लष्कर आणि सीआरपीएफ व्यतिरिक्त, जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे कर्मचारी दहशतवाद्यांचा शोध घेण्यात गुंतले आहेत.

काल पहलगाममध्ये ५ टीआरएफ दहशतवाद्यांनी २७ पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली होती. दहशतवाद्यांनी प्रथम  धर्माच्या आधारे हिंदू पर्यटकांची ओळख पटवली. त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. इतर देशांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे.

हे ही वाचा : 

पहलगाम हल्ल्यात विशाखापट्टणमच्या निवृत्त बँकरचा मृत्यू

पहलगाम हल्ला : मुंबईतील नागरिकांसाठी आपत्कालीन मदत कक्ष

पहलगाम दहशतवादी हल्ला : जम्मू-काश्मीर सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख

एअरलाईन्सनी तिकीट दराबद्दल विचार करा

दरम्यान, पहलगामच्या बैसरणला मिनी स्वित्झर्लंड म्हटले जाते. बैसरण हे पहलगाम शहरापासून ६ किलोमीटर अंतरावर आहे. हा परिसर घनदाट पाइन जंगले आणि पर्वतांनी वेढलेला आहे, म्हणूनच येथे मोठ्या संख्येने पर्यटक आणि ट्रेकर्स भेट देण्यासाठी येतात. याच बैसरणमध्ये, AK-४७ ने सशस्त्र ५ दहशतवाद्यांनी प्रवेश केला आणि पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
246,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा