अरविंद केजरीवाल यांना जनपाठिंबा दाखवण्यासाठी वापरले जगन्नाथ पुरीमधील जुन्या रथयात्रेचे छायाचित्र

अरविंद केजरीवाल यांना जनपाठिंबा दाखवण्यासाठी वापरले जगन्नाथ पुरीमधील जुन्या रथयात्रेचे छायाचित्र

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना लोकांकडून किती मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे, हे पक्षाच्या वतीने सांगितले जात आहे. ‘आप’च्या काही समर्थकांनी तर मोठा जमाव केजरीवाल यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरला असल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. मात्र या छायाचित्राचे तथ्य तपासले असता, ते छायाचित्र ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ रथयात्रेत जमलेल्या भाविकांचे असून ते जुने असल्याचे उघड झाले आहे.

एका नेटिझनने हे छायाचित्र पोस्ट केल्यानंतर अनेकांनी हेच छायाचित्र पोस्ट करून केजरीवाल यांना पाठिंबा दिला आहे. ‘हे छायाचित्र दाखवतेय की, हुकूमशाहीचा अंत जवळ आहे… केजरीवाल यांच्या अटकेविरोधात लोक रस्त्यावर’ अशी प्रतिक्रिया देऊन हे चेन्नईतील गर्दीचे छायाचित्र असल्याचे एका व्यक्तीने ‘एक्स’वर पोस्ट केले आहे.

हे ही वाचा:

नरेंद्र मोदींना मत द्या हीच लग्नाची भेट; तेलंगणातील लग्नपत्रिका व्हायरल

उज्जैनमधील महाकाल मंदिरात भस्म आरतीदरम्यान आग; पुजाऱ्यासह १३ जण जखमी

तांबड्या समुद्रात भारतीय नौदलाची करडी नजर, चाच्यांना ‘मामा’ बनवणार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लेहमध्ये जवानांसोबत साजरी केली होळी!

त्यानंतर अनेक समर्थकांनी हेच छायाचित्र पोस्ट करून व्हायरल केले आहे. मात्र या छायाचित्राच्या तथ्याचा शोध घेतला असता ही मोठी गर्दी ओडिशातील जगन्नाथ रथयात्रेमधील भाविकांची असल्याचे उघड झाले आहे. हे छायाचित्र सन २०२३च्या जून महिन्यातील रथयात्रेदरम्यानचे आहे. हे छायाचित्र वर्षभरापूर्वी सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. खुद्द ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी हे छायाचित्र २० जून २०२३ रोजी पोस्ट केले होते. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा खोटारडेपणा उघड झाला आहे.

Exit mobile version