संसद सुरक्षाभंग प्रकरणातील सर्व आरोपींच्या फोनचे सुटे भाग राजस्थानमधून हस्तगत!

आरोपी ललित आणि अन्य आरोपींची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांचे मोबाइल कंपनीला पत्र

संसद सुरक्षाभंग प्रकरणातील सर्व आरोपींच्या फोनचे सुटे भाग राजस्थानमधून हस्तगत!

संसद सुरक्षाभंग प्रकरणातील सर्व आरोपींच्या मोबाइल फोनचे सुटे भाग राजस्थानमधून हस्तगत करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिली. या संपूर्ण कटाचा सूत्रधार ललित झा याने सर्व आरोपींचे फोन हस्तगत करून ते जाळले होते. हे सर्व फोन जळालेल्या अवस्थेत सापडले आहेत.

ललित झा याने दिल्लीला येण्याआधीच सर्व आरोपींचे पाच मोबाइल फोन दिल्लीला येण्याआधीच नष्ट केल्याचे सांगत पोलिसांना खोटे सांगितले होते. मात्र दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललित झा याने चार नव्हे तर पाच फोन राजस्थानमधील कुचामान येथे पळून जात असताना नष्ट केले होते.

हे ही वाचा:

पाकिस्तान महिलांसाठी सुरक्षित नाही

माफिया डॉन मुख्तार अन्सारी याचे संस्थान खालसा होण्याच्या वाटेवर!

बिहारमध्ये डॉक्टरांची दारू पार्टी!

ठाकरेंच्या मोर्चात बेगान्यांचीच गर्दी

ललितने दिल्लीला येताना पहिल्यांदा चार आरोपींचे फोन नष्ट केले. त्यानंतर त्याने दिल्लीला येण्यापूर्वी स्वतःचा फोन नष्ट केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ललित हा तपास पथकाची सातत्याने दिशाभूल करतो आहे. पोलिसांनी अधिक माहितीसाठी मोबाइल कंपनीला ललित आणि अन्य आरोपींची माहिती मिळवण्यासाठी पत्र लिहिले आहे.संसद सुरक्षाभंगाप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सर्व पाचही आरोपींना अटक केल्याचे शनिवारी सांगितले होते. प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधण्यासाठी स्वतःच्या शरीराला अग्निरोधक जेल फासून ते आत्मदहन करण्याचे नाटक रचणार होते.

मात्र त्यांनी ही योजना बासनात गुंडाळली आणि लोकसभा सभागृहात उडी मारण्याचे ठरवले. लोकसभा सभागृहात शून्य प्रहरात सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांनी प्रेक्षागृहातून लोकसभा सभागृहात उडी मारली. तसेच, त्यांनी धुराची नळकांडी फोडली. मात्र खासदारांनी त्यांना पकडले. त्याचवेळी सभागृहाबाहेर आलेल्या अमोल शिंदे आणि नीलमदेवी यांनी घोषणाबाजी देऊन नळकांडीतून धूर सोडला. तर, पाचवा आरोपी ललित झा त्यांच्या या निषेध आंदोलनाचे चित्रिकरण सोशल मीडियावर प्रसारित करत होता.

Exit mobile version