फिलिपाईन्सच्या बोटीला भीषण आग, १२० जणांची सुटका !

बोट समुद्राच्या मध्यभागी असताना हा अपघात झाला

फिलिपाईन्सच्या बोटीला भीषण आग, १२० जणांची सुटका !

तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार, एस्परान्झा स्टार या जहाजाला रविवारी पहाटे आग लागली.बचाव कार्य आणि आग वीजवण्यासाठी दोन जहाजे तैनात करण्यात आल्याची माहिती मिळाली.या जहाजात १२० जण होते त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे तटरक्षक दलाकडून सांगण्यात आले.
तटरक्षक दलाने सांगितले की, M/V एस्पेरांझा स्टारला रविवारी पहाटेच्या सुमारास सिक्विजोर प्रांतातून मध्य फिलीपिन्समधील बोहोल प्रांताकडे जात असताना आग लागली.

 

या जहाजामध्ये असणारे १२० पैकी ६५ प्रवासी होते आणि ५५ क्रू मेंबर्स होते.फोर्सने जारी केलेल्या चित्रे आणि व्हिडिओंमध्ये बोटीच्या कड्यातून ज्वाला आणि काळा धूर निघत असल्याचे दिसून आले.तर जहाजावरील तटरक्षक दलाचे कर्मचारी आग विझवण्यासाठी पाण्याच्या तोफांचा वापर करताना दिसले.त्या चित्रात एक मासेमारी बोट आणि दुसरे जहाजही दाखवले आहे.तटरक्षक दलाचे प्रवक्ते जॉय गुमाटे यांनी एका निवेदनात सांगितले की, बोटीवरील सर्व लोक सुरक्षित आहेत.मात्र या घटनेसंबंधित गुमाटे यांनी अधिक तपशील दिलेला नाही.ते पुढे म्हणाले, सुटका करण्यात आलेल्या लोकांना ‘बोहोल प्रांतातील तगबिलारान’ या शहरात आणण्यात आले असून त्यांची चौकशी सुरु आहे.

हे ही वाचा:

नेताजी सुभाषचंद्र बोस असते तर देशाची फाळणी झालीच नसती!

‘आपत्ती व्यवस्थापनात भारत एक मोठी जागतिक शक्ती’

बिहारमध्ये उष्माघाताने २४ तासांत ३५ जणांचा मृत्यू

सुट्टीवर गेलेल्या उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; मनिषा कायंदे शिवसेनेत जाणार

जहाजाला अचानक आग लागण्याचे कारण विचारले असता ते म्हणाले, फिलिपाईन्समध्ये असे बोटींचे अपघात होणे खूप सामान्य आहे,कारण विशेषतः दुर्गम प्रांतामध्ये येणारे वादळ ,देखभाल न केलेली खराब जहाजे ,ओव्हरलोडींग आणि सुरक्षा नियमांकडे करण्यात आलेले दुर्लक्ष त्यामुळे अशा अपघाताच्या घटना घडत असतात.

 

तटरक्षक दलाने सांगितले की, मार्चमध्ये सुमारे २५० लोकांना घेऊन जाणाऱ्या एका जहाजाला आग लागली आणि रात्रभर आग वाढत राहिली.त्या अपघातात ३१ प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला होता.मात्र या वेळी क्रूने धडा घेत सर्वाना वाचवले.

Exit mobile version