भारताला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. १८ ऑगस्ट १९४५ रोजी सुभाषचंद्र बोस यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यू पश्चात अजूनही शंका उपस्थित केल्या जात आहेत. सुभाषचंद्र बोस यांची एकुलती एक मुलगी अनिता बोस फाफ यांनी नेताजींच्या पार्थिवाचे अवशेष टोकियो येथील रेन्कोजी मंदिरात असल्याचे सांगितले. ते अवशेष आता पुन्हा भारतात आण्याची वेळ आली आहे असं फाफ यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच ‘डीएनए’ चाचणीमध्ये नेताजींच्या अवशेषांचे वैज्ञानिक पुरावे मिळाले असून, चाचणीसाठी जपान सरकरने सहमती दिली आहे. असे फाफ यांनी सांगितले.
नेताजींची एकुलती एक मुलगी फाफ यांनी निवेदनात म्हटले आहे की, वडील स्वातंत्र्याचा अनुभव घेण्यासाठी हयात नव्हते. मात्र त्यांचे अवशेष भारत भूमीत पर आणण्याची वेळ आली आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘डीएनए’ चाचणीतील वैज्ञानिक पुराव्यांमुळे जपान मधील त्या अवशेषांचे ओळख पटू शकते. सुभाषचंद्र बोस यांचा अपघाती मृत्यूमुळे अजूनही शंका उपस्थित केल्या जात आहेत. टोकियोच्या रेन्कोजी मंदिरात ठेवलेले अवशेष त्यांचेच असल्याचा वैज्ञानिकांना पुरावा मिळू शकतो.
परकीय राजवटीपासून मुक्त झालेल्या भारतात त्यांना राहण्याची इच्छा होती. नेताजींना देशाच्या स्वातंत्र्यापेक्षा काहीही महत्वाचे नव्हते. मात्र आता त्यांचे अवशेष भारत भूमीत परत आणण्याची वेळ आली आहे. नेताजींच्या मृत्यू पश्चात आता पर्यंत तीन वेळा आयोगा मार्फत चौकशी करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन आयोगाच्या चौकशीत नेताजींना मृत घोषित करण्यात आले असून, तिसऱ्या आयोगाच्या चौकशीत मात्र ते अजूनही जीवंत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नेताजींच्या मृत्यूवर अजूनही शंका उपस्थित केल्या जात आहेत.
भारतीय देशवासीयांनी आणि देशबांधवांनी त्यांच्या समर्पणाबद्दल आणि त्यांच्या बलिदानाबद्दल त्यांची स्मारके उभारली आहेत. अशा प्रकारे त्यांची स्मृती आजपर्यंत, कौतुकाने, कृतज्ञतेने आणि अगदी प्रेमाने जिवंत ठेवली आहे, असे फाफ यांनी सांगितले. जपानने टोकियो येथील रेन्कोजी मंदिरात त्यांच्या अवशेषांसाठी ‘तात्पुरते’ घर दिले असून, ज्याची भक्तीभावाने काळजी घेतली आहे. याजकांच्या तीन पिढ्यांकडून आणि जपानी लोकांनी नेताजींचा सन्मान केला. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली, मात्र स्वातंत्र्यासाठी लढणारे ‘नायक’ बोस अजूनही मायदेशी परतले नाहीत. अशी खंत फाफ यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा:
रश्दी यांच्या सॅटॅनिक व्हर्सेससाठी गुगलवर गर्दी
वांद्रे येथे गोळीबार करणाऱ्याला केली अटक
कोकण किनारपट्टी, प. महाराष्ट्र, विदर्भात सरीवर सरी
आपण भारतीय, पाकिस्तानी आणि बांगलादेशी स्वातंत्र्यात जगू शकतो. मात्र नेताजी अजून स्वातंत्र्यपासून वंचित आहेत. मी तुम्हा सर्वांना माझे भाऊ आणि बहिणी म्हणून सलाम करते आणि नेताजींना घरी आणण्याच्या माझ्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करते असे, समस्त भारतीयांना फाफ यांनी आवाहन केलं आहे.