…त्याने दारूचे दुकान बंद करून थाटले किराणा स्टोअर! वाचा

…त्याने दारूचे दुकान बंद करून थाटले किराणा स्टोअर! वाचा

देर आए दुरुस्त आहे ही प्रचलित म्हण आपण सर्वांनीच ऐकली आहे. याची प्रचिती कामती या गावातील रहिवाशांना आलेली आहे. कामती गावातील दारू विक्री करणारा एका इसमाने दुकान बंद करून चक्क, किराणा दुकान उघडले आहे.

हा बदल नक्कीच खूप स्वागतार्ह आहे. या बदलासाठी या दारूच्या दुकान चालकाना पोलिसाने प्रवृत्त केले असल्याचे स्पष्ट झालेले आहे. पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी कामती खुर्द लमाणतांडा येथील अवैध दारू विक्रेते सिद्राम राठोड यांचे मनपरिवर्तन करून त्यांना किराणा दुकान टाकण्याचा सल्ला दिला. हा सल्ला राठोड यांनी ऐकला हीच महत्त्वाची बाब यातली आहे. दारूचे दुकान बंद करून राठोड यांनी चक्क किराणा दुकान थाटले. त्यामुळे या गावातूनही त्यांच्या या बदलाचे स्वागत होत आहे.

राठोड हे गेल्या २५ वर्षापासून दारू विक्रीचा व्यवसाय करीत होते. त्यामुळे समाजातील सर्वच स्तरामधून या गोष्टीचे कौतुक होत आहे. कामती पोलीस ठाण्यांतर्गत एकूण २८ गावे येतात. ऑपरेशन परिवर्तनसाठी प्रत्येक गावाला एक पोलीस असे अठ्ठावीस गावांना २८ पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत अवैध दारू विक्रेत्याचे मनपरिवर्तन करून त्यांना योग्य प्रवाहात आणायचा हेतू आहे. यालाच अनुसरून कामती पोलीस ठाण्यांमध्ये या मोहिमेची अंमलबजावणी केली जात आहे.

हे ही वाचा:

नवी मुंबईत अनधिकृत झोपड्या मिळताहेत लाखात

अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यामुळे पंजाब मध्ये काँग्रेसची आत्महत्या

पुढील दोन दिवस राज्यात कोसळधारा!

‘उठा उठा दिवाळी आली…’ जाहिरातीतील ‘अलार्म काकां’ची एक्झिट!

सध्याच्या घडीला राठोड यांनी एक जनहिताचे पाऊल उचलले आहे. पोलिसांनी केलेल्या समुपदेशनानंतर राठोड यांनी दारू विक्री करून दुसऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करण्याऐवजी स्वत:च बदलण्याचा निर्णय घेतला आणि गावातच मोठे किराणा दुकान सुरू केले आहे.

Exit mobile version