28 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषधावत्या रेल्वेमध्ये पढला जातोय नमाज

धावत्या रेल्वेमध्ये पढला जातोय नमाज

Google News Follow

Related

नमाज पढण्यासाठी रस्ते अडवणे, सार्वजनिक ठिकाणी पथाऱ्या पसरून नमाज अदा करणे हे प्रकार होतच असतात. आता तर धावत्या रेल्वेमध्येही आसन अडवून त्यावर नमाज पढण्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भातील एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

लोकल रेल्वेच्या एका डब्यात एक व्यक्ती नमाज पढताना या व्हीडिओत दिसते. प्रत्यक्ष आसनावरच चादर अंथरून सदर व्यक्ती नमाज अदा करते.

पश्चिम रेल्वेच्या विरार-चर्चगेट मार्गावरील एका रेल्वेतील हा प्रकार आहे. रेल्वेत हे प्रकार आता सर्रास होऊ लागल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यासंदर्भातील व्हीडिओच आता व्हायरल झाला असून मोकळ्या आसनावर एक मुस्लीम व्यक्ती नमाज पढताना दिसत असून त्याने ते संपूर्ण रिकामे आसन नमाज पढण्यासाठीच वापरले आहे. थोड्यावेळाने पुढील स्टेशनवर लोक डब्यात शिरल्यानंतरही त्या माणसाने आपले नमाज पढणे सुरू ठेवल्याचे दिसते. त्या आसनावर नंतर ही व्यक्ती उभे राहून प्रार्थना करत आहे. सदर व्यक्ती त्या आसनावर चादर अंथरून नमाज पढत असल्यामुळे डब्यात शिरलेल्या लोकांना बसण्यासाठी जागाही तो माणूस देताना दिसत नाही.

यानिमित्ताने रेल्वेच्या डब्यात अधिकृत पासधारकांना, तिकीटधारकांना होत असलेल्या त्रासालाही वाचा फुटली आहे.

यासंदर्भात प्रवाशांचे म्हणणे आहे की, अशा अडवणुकीविरोधात रेल्वे प्रशासनाकडे तक्रारीही करण्यात आल्या आहेत पण त्याकडे काणाडोळा केला जातो. विशेषतः फर्स्ट क्लासच्या डब्यात अधिकृत प्रवाशांना असा त्रास नेहमीच होत असतो. अशा लोकांना जाब विचारला तर त्यांच्याकडून अरेरावी करण्यात येत असल्याचाही अनुभव आहे.

प्रवासी असे सांगतात की,  फर्स्ट क्लासच्या डब्यात मिरारोड, नालासोपारा याठिकाणी बुरखाधारी महिला, मुले, पुरुष मोठ्या संख्येने शिरतात आणि जागा अडवत असल्याचा अनुभव आम्ही घेतला आहे. त्यांना हटकले तर आम्ही रोजच या डब्यातून प्रवास करत असल्याचे सांगितले जाते. फर्स्ट क्लासचा रीतसर पास काढणाऱ्यांवर दादागिरीही केली जाते.

हे ही वाचा:

‘सरसेनापती हंबीरराव’ चा खतरनाक टीजर

श्रीनगरमध्ये लष्कर- ए- तोयबाचा दहशतवादी ठार

आमदार अतुल भातखळकरांचे उद्धव ठाकरेंना तीन सवाल! मुख्यमंत्री देणार का उत्तर?

ऐकावे ते नवलच …… महिलेच्या यकृतामध्ये चक्क बाळ!

 

एका प्रवाशाने सांगितले की, आम्ही एवढे पैसे खर्च करून फर्स्ट क्लासचा पास काढतो, पण तिथे जर विनातिकीट प्रवासी घुसखोरी करत असतील आणि जागा अडवत असतील तर काय करायचे? यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे तक्रारीही करण्यात आलेल्या आहेत पण त्यांच्याकडून लक्ष दिले जात नाही. किंबहुना, फर्स्ट क्लासमध्ये तिकीट तपासनीसही येत नाहीत त्यामुळे अशा विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे फावले आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले तर विनाकारण प्रवाशांची अडवणूक होणार नाही. रेल्वे प्रशासन याची दखल घेणार का?

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा