रेल्वेमधील वरची सीट अंगावर पडल्याने केरळमधील व्यक्तीचा मृत्यू

बर्थमध्ये कोणतीही त्रुटी नसल्याचे रेल्वेचे स्पष्टीकरण

रेल्वेमधील वरची सीट अंगावर पडल्याने केरळमधील व्यक्तीचा मृत्यू

केरळ ते नवी दिल्ली असा रेल्वेप्रवास करणाऱ्या एका व्यक्तीवर वरची सीट पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी केल्यानंतर भारतीय रेल्वेने बुधवारी स्पष्टीकरण जाहीर केले आहे. या सीटमध्ये कोणतीही त्रुटी नव्हती, सीट बसवताना साखळी नीट बसवण्यात न आल्यामुळे हा अपघात झाला, असे स्पष्टीकरण रेल्वेने दिले आहे. अली खान नावाचा ६२ वर्षीय प्रवासी एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन मिलेनियम सुपरफास्ट एक्स्प्रेस (१२६४५)च्या स्लीपर कोचमधून प्रवास करत असताना गेल्या आठवड्यात ही घटना घडली.

वरच्या बर्थवर दुसरा प्रवासी बसला होता. तर, खालच्या बर्थवर खन विश्रांती घेत होते. तेव्हा अचानक वरचा बर्थ खान यांच्यावर कोसळला. खाली पडलेला बर्थ आणि वरच्या प्रवाशाचे वजन यामुळे खान यांना गंभीर दुखापत झाली. रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, शस्त्रक्रिया सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

घटनेच्या काही दिवसांनंतर, भारतीय रेल्वेने स्पष्टीकरण जाहीर केले आहे. हा अपघात बिघडलेल्या बर्थमुळे झाला नसल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांनी या बर्थची तपासणी केली असता, प्रवाशाने साखळी वापरून वरचा बर्थ व्यवस्थित लॉक न केल्यामुळे हा अपघात झाल्याचे आढळून आले आहे.

‘संबंधित प्रवासी एस ६ कोचच्या सीट क्रमांक ५७ (लोअर बर्थ)वरून प्रवास करत होता. प्रवाशाने वरच्या बर्थची चेन चुकीच्या पद्धतीने बसवल्यामुळे वरच्या बर्थची सीट खाली पडली,’ असे रेल्वे मंत्रालयाच्या प्रवक्त्याने अधिकृत स्पष्टीकरणात सांगितले.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदी यांचा मुलाखतीतील दावा ठरला खरा

राऊत म्हणतात, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करा

केजरीवालांना सीबीआय कोठडीत भगवद्गीता बाळगण्याची परवानगी

चांद्रयान- ४ चंद्रावर पोहचण्यापूर्वीच रचणार इतिहास; यानाचे भाग दोन प्रक्षेपणांद्वारे कक्षेत पाठवणार

‘दुसरीकडे, रेल्वे कर्मचाऱ्यांना, रामागुंडम स्थानकावर संध्याकाळी सहा वाजून ३४ मिनिटांच्या सुमारास संदेश मिळाल्यानंतर, ऑन-ड्युटी स्टेशन मास्टरने तात्काळ १०८ रुग्णवाहिकेद्वारे मदतीची व्यवस्था केली आणि रामागुंडम येथे रेल्वे थांबवली. प्रवाशाला कोचमधून रुग्णवाहिकेत हलवण्यात आले आणि जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले,’ असे निवेदनात म्हटले आहे.

Exit mobile version