बॅडमिंटन खेळल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने खेळाडूचे निधन

सुमारे अर्धा तास खेळल्यानंतर शर्मा यांना चक्कर आली. मात्र आजूबाजूचे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू

बॅडमिंटन खेळल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने खेळाडूचे निधन

नोएडा स्टेडियमवर शनिवारी बॅडमिंटन खेळत असताना एका ५२ वर्षीय व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येऊन त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अर्धा तास खेळल्यानंतर त्यांना चक्कर आली होती. तेव्हा ते थोडा वेळ बसले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला. सेक्टर २६मध्ये राहणारे व्यावसायिक महेंद्र शर्मा बॅडमिंटन खेळण्यासाठी सकाळी सात वाजता खेळण्यासाठी स्टेडियमवर आले होते.

सुमारे अर्धा तास खेळल्यानंतर त्यांना चक्कर आली. त्यामुळे ते थोडावेळ बसले होते. मात्र आजूबाजूचे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. कोर्ट नंबर एकवर मेट्रो रुग्णालयाचे डॉ. संदीप कंवर हेसुद्धा बॅडमिंटन खेळत होते. महेंद्र यांची परिस्थिती बघून ते त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना सीपीआर (हृदयविकार झाल्यावर दिले जाणारे प्राथमिक उपचार) दिला. रुग्णवाहिकेलाही बोलावण्यात आले.

१० मिनिटे प्राथमिक उपचार दिल्यानंतरही त्यांच्यामध्ये कोणतीही हालचाल दिसली नाही. अखेर महेंद्र यांना रुग्णवाहिकेतून मेट्रो रुग्णालयात नेण्यात आले होते. रुग्णालयातही त्यांना एक तास उपचार देण्यात आले. मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नाही. मेट्रो रुग्णालयाचे समूहाचे संचालक आणि ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. समीर गुप्ता यांनी रुग्णाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती दिली. महेंद्र शर्मा हे नोएडा स्टेडियमवर पाच वर्षे बॅडमिंटन खेळत होते. करोनाकाळात स्टेडियम बंद होते. मात्र त्यानंतर ते नियमितपणे स्टेडियमवर येऊन खेळ खेळत होते. जिल्हा बॅडमिंटनचे सिव आनंद खरे यांनी सांगितले की, शर्मा हे नियमितपणे खेळण्यास येत पण ही घटना घडल्यामुळे आम्हालाही दुःख होत आहे.

हे ही वाचा:

कुस्तीगीर म्हणतात, सर्व प्रश्न सुटले तरच आशियाई स्पर्धेत खेळू!

‘गदा’ कुणाकडे? भारत की ऑस्ट्रेलिया, भारताला हव्यात २८० धावा, ७ विकेट्स शिल्लक

शरद पवारांनी नेहमीप्रमाणे अजित पवारांना डावललं?

घनदाट जंगलात ११ महिन्यांच्या बाळासह ४० दिवसानंतरही ४ मुले राहिली जिवंत

डॉ. समीर गुप्ता यांनी सांगितले की, जर एखादा खेळाडू असो की सर्वसामान्य व्यक्ती त्याला छातीत वेदना होत असतील किंवा चालताना त्याला दम लागत असेल तर त्याने लागलीच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. शिवाय, डॉक्टर सांगतील त्याप्रमाणेच पुढे काम केले पाहिजे. नाहीतर अशा परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. जेव्हा अशी परिस्थिती असेल तेव्हा खेळापासून काही काळ लांब राहायला हवे. डॉक्टरांच्या सूचनेनुसारच खेळात पुन्हा सहभागी व्हावे.

Exit mobile version