नाकाने कांदे सोलणे अशी एक म्हण मराठीत आहे. पण आता नाकाने शब्द लिहिणे असाही वाकप्रचार अस्तित्वात यायला हरकत नाही. कारण नाकाने वर्णमाला लिहिण्याचा विक्रम विनोद कुमार चौधरी यांनी केला असल्याचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने म्हटले आहे. त्यांनी स्वतःचाच विक्रम मोडला आहे. एक्स वर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने विनोद कुमार चौधरी यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ते नाकाने टाइप करताना दिसत आहेत.
हेही वाचा..
अंबानींच्या क्रूझचे टायटॅनिक व्हावे… स्वयंघोषित इतिहासकार रुचिका शर्माची अभद्र भाषा
मोदी जिंकले तर न्यायालयात जाऊ…जनआंदोलन उभारू… विरोधी पक्ष, आंदोलनजीवी, पाळीव पत्रकारांची योजना
‘मां तुझे सलाम’ गाणे म्हणता म्हणता माजी सैनिकाने गमावले प्राण
अल्पवयीन मुलीवर मौलावीकडून बलात्कार
२०२३ मध्ये ४४ वर्षांच्या विनोद यांनी २७.८० सेकंदांसह विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर त्या वर्षी २६.७३ सेकंद अशी वेळ नोंदवली गेली. यावेळी विनोदने २५.६६ सेकंदाची वेळ नोंदवत मागील विक्रम मोडीत काढले. विनोद यांनी कीबोर्डवर रोमन वर्णमाला टाईप करणे गरजेचे होते आणि प्रत्येक अक्षरादरम्यान एक जागा टाइप करणे आवश्यक होते.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डशी बोलताना विनोद म्हणाले, माझा व्यवसाय टायपिंग आहे, म्हणूनच मी त्यात एक रेकॉर्ड करण्याचा विचार केला. ज्यामध्ये माझी आवड आणि माझी उपजीविका दोन्ही अवलंबून आहे. माझा विश्वास आहे की तुमच्या आयुष्यात तुम्हाला कितीही समस्यांचा सामना करावा लागला तरी तुम्हाला तुमची आवड अनंतकाळपर्यंत टिकवून ठेवायची आहे.
‘टायपिंग मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे विनोद हे विजेतेपद मिळविण्यासाठी तासनतास सराव करत आहेत. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या वेबसाइटवर नमूद केल्यानुसार, विनोद कुमार चौधरी यांच्याकडे ५.३६ सेकंदांसह पाठीमागे वर्णमाला (एकल हाताने) टाइप करण्याचा सर्वात जलद वेळ आणि पाठीमागे हाताने ६.७८ सेकंदांसह वर्णमाला टाइप करण्याचा सर्वात जलद वेळ असा विक्रम आहे.