ज्ञानवापी मशिदीच्या आतील ‘वझुखाना’ साफ करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. मे २०२२ पासून ही टाकी सील करण्यात आली होती. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्या. जे. बी. परडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने वाराणसीच्या एसडीएमला टाकीच्या स्वच्छतेवर देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले.
हिंदू याचिकाकर्ते आणि मस्जिद समिती या दोघांनीही सील केल्याने अस्वच्छ पाणी घाण होत असल्याने आणि टाकीमध्ये राहणारे मासे मरण पावले असल्याने ते आवश्यक असल्याचे सांगितल्यानंतर खंडपीठाने टाकीची साफसफाई करण्याच्या याचिकेला परवानगी दिली. १२ ते २३ डिसेंबर २०२३ दरम्यान मृत माशांमुळे ‘वझुखाना टाकी’ साइटवर घाण साचली होती, असे नमूद करून हिंदू बाजूने या वर्षाच्या सुरुवातीला याचिका दाखल केली होती.’वझुखाना’ हे जलाशय आहे जेथे भक्त नमाज अदा करण्यापूर्वी वझू (हातपाय धुण्यासाठी) करण्यासाठी जातात.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लेपाक्षीच्या वीरभद्र मंदिराला दिली भेट
दहशतवादी पन्नूला आली पुन्हा धमकी देण्याची खुमखुमी!
विमानतळावरील व्हायरल व्हिडीओनंतर नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोने इंडिगोकडून मागविले उत्तर
भारतीय समाजाचा मानबिंदू नष्ट करण्याचे अथक प्रयत्न
१६ मे २०२२ पासून हिंदू बाजूने ‘शिवलिंग’ आणि मुस्लिम बाजूने ‘फवारा’ असल्याचा दावा करणाऱ्या रचना सापडल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. काशी विश्वनाथ मंदिराशेजारी असलेल्या मशिदीच्या न्यायालयाच्या आदेशानुसार केलेल्या सर्वेक्षणादरम्यान हे आढळून आले. हिंदू भाविकांच्या याचिका आणि सर्वेक्षणाची वैधता कायम ठेवण्याचा मुख्य मुद्दा अद्याप न्यायालयासमोर प्रलंबित आहे.