दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी जम्मूमध्ये एनएसजीचे पथक कायमस्वरूपी तैनात !

गृह मंत्रालयाने उचलले पाऊल

दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी जम्मूमध्ये एनएसजीचे पथक कायमस्वरूपी तैनात !

जम्मूमध्ये दहशतवाद्यांची आता खैर नाही. कारण एनएसजी कमांडोचे टास्क फोर्स जम्मू शहरात कायमस्वरूपी उपस्थित राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही मोठ्या दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्यासाठी ही टास्क फोर्स तत्काळ कारवाई करण्यास तयार असणार आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, एनएसजीचे एक विशेष पथक आता जम्मू शहरात कायमस्वरूपी तैनात करण्यात आले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत दहशतवाद्यांशी काही मिनिटांतच मुकाबला करण्यासाठी हे पथक सज्ज असेल. जम्मू भागात नुकतेच सुरक्षा दलांवर झालेले दहशतवादी हल्ले आणि शहराला संभाव्य धोका लक्षात घेऊन गृह मंत्रालयाने हे पाऊल उचलल्याची माहिती आहे.

हे ही वाचा : 

बांगलादेशात साधू चिन्मय प्रभूंच्या अटकेविरोधातील निदर्शनात वकिलाचा मृत्यू!

कुस्तीपटू बजरंग पुनिया चार वर्षांसाठी निलंबित!

मुस्लिम मते जिथे जिथे, उबाठाचा विजय तिथे तिथे!

‘निवडणूक जिंकल्यावर ईव्हीएम चांगलं, हरल्यावर ईव्हीएममध्ये गडबड’

सुरक्षेच्या कारणास्तव NSG कमांडोची संख्या उघड करण्यात आलेली नाही, परंतु अधिकाऱ्यांनी त्याचे वर्णन “पुरेसे” असे केले आहे. यापूर्वी दहशतवादी हल्ले झाल्यास एनएसजी कमांडोंना नवी दिल्ली किंवा चंदीगड येथून बोलवावे लागत, ही प्रक्रिया वेळखाऊ होती. मात्र, आता एनएसजी कमांडोची स्थानिक उपस्थिती त्वरित कारवाई करेल.

NSG कमांडोची तैनाती जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या (JKP) दहशतवादविरोधी योजनेचा एक भाग आहे. ही योजना प्रामुख्याने उंच इमारती, शॉपिंग मॉल, सिनेमा हॉल आणि इतर संवेदनशील ठिकाणांना दहशतवादी हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

 

 

Exit mobile version