बीड जिल्ह्यातील शासकीय जिल्हा रुग्णालयात एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका महिलेच्या आतड्याला छिद्र पडले आहे. प्रसूतीसाठी सिजर करण्याकरिता आलेल्या महिलेच्या आतड्याला छिद्र पडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नातेवाईकांनी दोषी डॉक्टरांवर कारवाईची मागणी करत पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अनेक रुग्णांच्या मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत असतात.तसाच प्रकार बीड जिल्ह्यातील शासकीय जिल्हा रुग्णालयात घडला आहे.प्रसूतीसाठी सिजर करण्यासाठी आलेल्या महिलेच्या आतड्याला चक्क छिद्र पडले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बीड तालुक्यातील एक महिला ९ नोव्हेंबर रोजी जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली होती.
हेही वाचा..
धनगर समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक
शाळेतील विद्यार्थ्यांना आता महाभारत आणि रामायणाचे मिळणार धडे!
सर्पदंशाने मृत्यू झालेल्या युवकाला जिवंत करण्याचा दावा; मृतदेहाच्या बाजूला तासन् तास झोपला मांत्रिक!
त्यांनतर १० नोव्हेंबर रोजी त्या महिलेला मध्यरात्री दीडच्या सुमारास सिझरसाठी घेण्यात आले.परंतु, सिझरिंग करत असताना डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेच्या आतड्याला जखम झाली.त्यांनतर महिलेला घरी पाठवण्यात आले.महिला घरी गेल्यांनतर दुसऱ्याच दिवशी तिला त्रास सुरु झाला आणि महिलेचे पोट फुगले.त्यामुळे नातेवाईकांनी महिलेला त्वरित एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.महिलेची सोनोग्राफी काढल्यानंतर महिलेच्या आतड्याला छिद्र पडल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबियांना एकच धक्का बसला.डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाला त्रास झाला.तसेच खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी तीन लाख रुपयांचा खर्च आला.त्यामुळे संतप्त झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी चौकशीसाठी जिल्हा रुग्णालय गाढले.रुग्णालयात मोठी गर्दी झाल्याने पोलीस घटनास्थळी पोहचले.निष्काळजी करणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बडे व पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह जिल्हाधिकारी यांच्याकडे ही मागणी करण्यात आली.नातेवाईकांची आक्रमक भूमिका पाहता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बडे यांच्याकडून चौकशी समिती नेमण्यात आली आहे.