विधानसभा निवडणुकीत जनता उद्धव ठाकरेंना नाकारेल

विधानसभा निवडणुकीत जनता उद्धव ठाकरेंना नाकारेल

दिल्ली दौ-यामधील पत्रकार परिषदेमधून उद्धव ठाकरे, आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन न्याय मागणार अशी वल्गना करत आहेत. मात्र हिंदुत्वाला तिलांजली, सरकारी योजनांमध्ये खोडा घालण्याचे प्रयत्न २०१९ मध्ये जनादेशाचा केलेला अनादर यामुळे उबाठा सेनेला जनता नाकारल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे राज्याच्या भल्यासाठी, जनतेच्या हितासाठी दिल्लीला जातात तेव्हा, महाराष्ट्र दिल्लीच्या इशा-यावर चालू देणार नाही या शब्दांत उद्धव ठाकरे टीका करतात. मग हेच ठाकरे महाशय आता दिल्ली दौ-यावर का गेले ?…… मुख्यमंत्रीपदाची याचना करण्यासाठी कोणाच्या दारात गेले?….दिल्ली दौ-यामध्ये ठाकरे यांनी आपणच किती कार्यक्षम मुख्यमंत्री होतो हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत विविध नेत्यांच्या भेटींदरम्यान मुख्यमंत्रीपदाची याचना करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

हेही वाचा..

विनेशला हरयाणा सरकारकडून ४ कोटी !

दादर रेल्वे स्थानकावर सापडलेल्या सुटकेसमधील मृतदेहाचे गूढ उकलले !

बांगलादेशी भारतात घुसत होते, सीमासुरक्षा दलांनी रोखले

सर्वसामान्यांना मोठा दिलासा; ७० औषधे होणार स्वस्त

महाविकास आघाडीतील एका सहकाऱ्याने त्यांच्या पुस्तकात तत्कालिन मुख्यमंत्री ठाकरे त्यांच्या संपूर्ण मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात केवळ एक दिवस मंत्रालयात गेले याची खंत वाटते असे मत व्यक्त केले होते. यावरूनच एक मुख्यमंत्री म्हणून श्री. ठाकरेंची कार्यक्षमता काय होती हे दिसून येते असा टोलाही त्यांनी लगावला.

Exit mobile version