मुंबईत कचऱ्याची समस्या कायम आहे. अनेक ठिकाणी कचरा कुंड्या नाहीत त्यामुळे लोक इतस्ततः हा कचरा टाकतात. त्यामुळे त्या ठिकाणी राहणाऱ्या किंवा पादचाऱ्यांना या कचऱ्याचा प्रचंड त्रास होतो. अनेकवेळा तशा तक्रारी करण्यात येतात पण पालिका अधिकाऱ्यांकडून त्याची नीट दखल घेतली जात नाही. परिणामी लोकांमध्ये तीव्र नाराजी असते.
हे ही वाचा:
नांदेडमधील शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
बेंगळुरूत वर्दळीच्या रस्त्यावरून बसस्टॉप चोरीला
मुंबई उपनगरात झोपड्पट्टीवासियांसाठी सरकार बांधणार ४०,००० शौचालये!
मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानाच्या समोर असाच कचरा टाकण्यास आता सुरुवात झाली असून त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत नागरिकांनी सातत्याने तक्रारी केल्या आहेत. सप्टेंबरपासून या तक्रारी केल्या जात आहेत पण त्याकडे लक्ष देण्यात आलेले नाही. पालिका अधिकाऱ्यांना वैयक्तिक तक्रारीही केल्या आहेत मात्र त्याची दखल घेतली जात नाही.