हायवेवर ट्रॅक्टर-ट्रॉली नेता येणार नाही, हायकोर्टाचा शेतकऱ्यांना सल्ला!

आंदोलनाचा सर्वांना अधिकार परंतु काही निर्बंधांचे पालनही व्हावे, हायकोर्ट

हायवेवर ट्रॅक्टर-ट्रॉली नेता येणार नाही, हायकोर्टाचा शेतकऱ्यांना सल्ला!

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात मंगळवारी शेतकऱ्यांच्या आंदोलन प्रकरणी सुनावणी पार पडली.सुनावणीवेळी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांना सांगितले आहे की, तुम्हाला महामार्गावर ट्रॅक्टर-ट्रॉली नेता येणार नाही.न्यायालयाने यासंदर्भात मोटार वाहन कायद्याचा हवाला दिला.तसेच मोठ्या संख्येने लोक कुठेही जमणार नाहीत याची काळजी घेण्याचे आदेश पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने पंजाब सरकारला दिले आहेत.

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांचे पंजाब- हरियाणा सीमेवर आंदोलन सुरू आहे.या आंदोलनात बहुसंख्य शेतकरी सहभागी असून अनेक शेतकरी आपल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीसह प्रवास करत आहेत.मात्र, यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत.शेतकऱ्यांच्या आंदोलनावर आज पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

हे ही वाचा:

मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा

कॉंग्रेसच्या अल्पसख्यांक विभागाला सर्वाधिक देणगी

७० वर्षांपूर्वीची अपुरी स्वप्ने मोदी पूर्ण करणार!

हिंदू नावाने राहणारे मुस्लिम बांगलादेशी दाम्पत्य अटकेत

ट्रॅक्टर-ट्रॉलीने मोठ्या संख्येने दिल्लीला जाणाऱ्या शेतकऱ्यांवर भाष्य करताना न्यायालयाने म्हटले आहे की, तुम्ही अमृतसर ते दिल्ली असा ट्रॉलीने प्रवास करण्याचा प्रयत्न करत आहात. प्रत्येक नागरिकाला त्याचे मूलभूत अधिकार माहित आहेत, परंतु काही घटनात्मक कर्तव्ये देखील आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने सांगितले.तसेच इथून पुढे महामार्गावर ट्रॅक्टर-ट्रॉली नेता येणार नाही, असे न्यायालयाने सांगितले.

मोठ्या संख्येने लोक कुठेही जमणार नाहीत याची काळजी घेण्याचे आदेश पंजाब सरकारला हायकोर्टाने दिले आहेत.हायकोर्टाने नमूद केले की, शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे.मात्र, त्यावर काही निर्बंध देखील आहेत ते पाळले पाहिजेत, असे न्यायालयाने सांगितले.आता या प्रकरणावर पुढील आठवड्यात सुनावणी पार पडणार आहेत.

Exit mobile version