लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, “आम्ही एकटे मीडिया, तपास यंत्रणा आणि न्यायपालिकेच्या वतीने काम करत आहोत. हे भारताचे वास्तव आहे.” त्यांच्या या टिपण्णीवर भारताचे माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी एएनआयशी बोलताना प्रतिक्रिया देत त्यांना सुनावले आहे. डीवाय चंद्रचूड म्हणाले की, न्यायपालिकेचे कार्य करण्याची जबाबदारी विरोधकांनी स्वतःवर घेतली आहे. न्यायव्यवस्था ही कायद्यांची छाननी करण्यासाठी आहे आणि लोकांनी असे गृहित धरू नये की, ते संसदेत किंवा विधानसभेत विरोधी भूमिका पार पाडेल.
एएनआयला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत माजी सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले की, लोकशाहीत राजकीय विरोधकांसाठी स्वतंत्र जागा असते. न्यायपालिकेने ते काम केले पाहिजे असे लोकांनी गृहीत धरू नये. संसदेत किंवा विधीमंडळामध्ये अनेकदा असा गैरसमज आहे की, न्यायपालिकेने विरोधी पक्षाची भूमिका बजावावी. आम्ही येथे कायद्यांची छाननी करण्यासाठी आहोत, असे डीवाय चंद्रचूड यांनी स्पष्ट केले आहे. कार्यकारी कृती कायद्याशी सुसंगत आहे की नाही, ती घटनेशी सुसंगत आहे की नाही याची छाननी करण्याचे कर्तव्य न्यायपालिकेवर सोपविण्यात आले आहे. लोकशाहीत राजकीय विरोधासाठी वेगळी जागा आहे, असेही ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधान यांच्याशी संवाद साधण्यावरून सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रियेबद्दल विचारले असता, डीवाय चंद्रचूड म्हणाले की, एखाद्या अधिकृत बैठकी दरम्यान एकत्र भेटीगाठी होणे स्वाभाविक आहे. काही वेळा तुम्ही विरोधी पक्षाच्या नेत्याशीही संवाद साधता. उदाहरणार्थ, अनेक निवड समितीमध्ये पंतप्रधान, सरन्यायाधीश, विरोधी पक्ष नेते यांचा समावेश असणे आवश्यक असतो. या बैठाकांनंतर तुम्ही १० मिनिटे चहा पिताना क्रिकेटपासून ते चित्रपटांपर्यंत सर्व गोष्टींबद्दल बोलणार आहात, असं माजी सरन्यायाधीश म्हणाले.
हे ही वाचा :
राज्यघटना लोकशाहीचा पाया असून संविधान देशासाठी सर्वात पवित्र ग्रंथ
चंदीगडमधील दोन क्लबबाहेर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी फेकली स्फोटके
पुन्हा एकदा रश्मी शुक्ला यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा पदभार
विधानसभा निवडणुकीत ८५% उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; १० वर्षांतील सर्वाधिक ३.५ कोटी रुपये जप्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी गणपती पूजेला हजेरी लावल्यानंतर निर्माण झालेल्या वादाला उत्तर देताना माजी सरन्यायाधीश म्हणाले की, हे काही विशेष आणि वेगळे नव्हते. याआधीही पंतप्रधानांनी सामाजिक प्रसंगी न्यायाधीशांच्या घरी भेट दिली होती. मला वाटते की आम्ही केलेल्या कामाच्या संदर्भात आमचे मूल्यमापन करा. मला असे वाटते की, ही एक सामाजिक भेट होती आणि हे काही वेगळे नाही. आम्ही करत असलेल्या कामात आम्ही एकमेकांपासून पूर्णपणे स्वतंत्र आहोत, या वस्तुस्थितीपासून लोकांनी विचलित होऊ नये, असं डीवाय चंद्रचूड म्हणाले.