मतदानात सहभागी होऊन लोक ईव्हीएमबाबतच्या शंकांचे उत्तर देतात!

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे ईव्हीएमसंबंधी प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना उत्तर

मतदानात सहभागी होऊन लोक ईव्हीएमबाबतच्या शंकांचे उत्तर देतात!

निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे. या दोन राज्यांसोबतच इतर १३ राज्यांतील पोटनिवडणुकीची घोषणाही केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, निवडणूक तारखांच्या घोषणेपूर्वी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ईव्हीएमवर विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर दिले आहे.

महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकांच्या तारखा घोषित होण्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप केला आहे. यावर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी सांगितले की, या प्रश्नाचे उत्तर जनतेने दिलेले आहे. एएनआयशी बोलताना राजीव कुमार म्हणाले की, “मतदानात सहभागी होऊन लोक प्रश्नांची उत्तरे देतात. ईव्हीएमचा प्रश्न आहे, तर ते १०० टक्के निर्दोष आहेत. जर त्यांनी आज पुन्हा प्रश्न उपस्थित केले तर आम्ही त्यांना पुन्हा सांगू.” यापूर्वी, काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी दावा केला होता की, इस्रायलने दहशतवादी संघटना हिजबुल्लाचे पेजर हॅक केले होते आणि हे उदाहरण देऊन त्यांनी म्हटले की, ईव्हीएममध्ये फेरफार केला जाऊ शकतो.

हे ही वाचा : 

राज्यपाल नियुक्त ७ आमदारांनी घेतली शपथ!

बोपदेव बलात्कार प्रकरणातील आरोपी अख्तरला पकडले, यापूर्वीही बलात्काराचा गुन्हा

मालाडमधील रिक्षाचालक, फेरीवाल्यांच्या मारहाणीत मनसे कार्यकर्ता दगावला

मदरशांत खरोखरच कुणी डोकावून पाहतंय का?

हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यापासून काँग्रेस नेते ईव्हीएमवर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. निकालानंतर दुसऱ्याच दिवशी पवन खेडा आणि जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएममधील त्रुटी सांगितल्या होत्या. मशीनच्या बॅटरीवर प्रश्न उपस्थित करत तक्रारही केली. काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील विरोधकांनी ईव्हीएमऐवजी कागदी मतपत्रिकांद्वारे मतदान करण्याचा आग्रह धरला पाहिजे, असं ते म्हणाले.

Exit mobile version