उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स आणि मुस्लिम समुदायाच्या लोकांनी कालियार शरीफ, हरिद्वार येथील जगप्रसिद्ध साबीर साहेब दर्गाह येथे चादर अर्पण केली आणि पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशात मजबूत सरकार स्थापनेसाठी प्रार्थना केली आहे.तसेच दर्ग्यामध्ये कव्वालांकडून कव्वालीचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (१४ मे ) वाराणसी मतदारसंघातून लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केला.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशासाठी केलेलं काम, गोर गरिब, शेतकऱ्यांच्या कल्याणाकरिता विविध काढलेल्या योजना, अशा अनेक गोष्टींमुळे देशातील जनतेला नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान म्हणून बघायचे आहे.मुस्लीम समाजाची देखील तशीच भावना आहे.नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे यासाठी उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स आणि मुस्लिम समुदायाच्या लोकांनी कालियार शरीफ, हरिद्वार येथील जगप्रसिद्ध साबीर साहेब दर्ग्यावर चादर चढवली आहे.तसेच यावेळी कव्वालांकडून कव्वालीचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.इतर जातींप्रमाणे मुस्लीम समुदायाकडेही पंतप्रधान मोदींनी लक्ष दिलं आहे.त्यामुळेच देशातील मुस्लिम समाज देखील पंतप्रधान मोदींच्या पाठीशी आहे.
हे ही वाचा:
दिल्ली: प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरण्यासाठी चोरट्याचा २०० वेळा विमान प्रवास!
विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघांच्या निवडणूका पुढे ढकलल्या
दिल्ली दारू घोटाळाप्रकरणी आता ‘आप’ आरोपी
वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, आज जगप्रसिद्ध साबीर साहेब दर्गा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयासाठी चादर अर्पण करण्यात आली आणि त्यांच्या विजयासाठी स्वच्छ मनाने प्रार्थना करण्यात आली.जगातील सध्याच्या परिस्थितीमुळे सर्वत्र अराजकतेचे वातावरण आहे. देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. अशा परिस्थितीत देशाची धुरा मजबूत हातात असायला हवी.दुर्बल व्यक्ती सत्तेवर आल्यास देशाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे यावेळी ऐतिहासिक विजय मिळवून नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान व्हावेत आणि देशाची धुरा सांभाळावीत, अशी प्रार्थना आम्ही केली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उत्तराखंडमधील लोकसभेच्या पाचही जागा प्रचंड बहुमताने जिंकणार असल्याचेही त्यांनी सांगितले.